आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After Trump's Tweet, Greta Got Along With Michelle, Said Ignore Those Who Doubt You

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्वीटनंतर ग्रेटाला मिळाली मिशेल ओबामांची साथ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गला डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करत रागावर नियंत्र ठेवण्याचा सल्ला दिला

वॉशिंग्टन- अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 16 वर्षीय स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गला रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला होता, त्यानंतर अमेरीकेच्या माजी प्रथम महिला आणि बराक ओबामा यांच्यी पत्नी मिशेल ओबामा या ग्रेटाच्या बाजूने उभ्या झाल्या आहेत. मिशेल ओबामा यांनी ग्रेटासाठी ट्वीट केले. त्यात लिहीले की, "कोणासाठीच आपली चमक कमी करू नकोस...सल्ला देणाऱ्यांकडे दुर्लक्ष कर आणि लक्षात ठेव लाखो लोक तुझ्यासोबत आहेत." यानंतर सर्वात कमी वयात 2019 च्या 'टाइम पर्सन ऑफ द ईयर' ग्रेटाने ट्रम्प यांच्या ट्वीटलाच आपले ट्विटर स्टेटस बनवले. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना ट्रोल करण्यात आले.

ट्रम्प यांनी ट्वीट केले होते की, "किती हास्यास्पद आहे, ग्रेटाला आपल्या रागावर निंयत्रण ठेवले पाहीजे आणि आपल्या मित्रांसोबत मिळून जुनी फॅशन चित्रपट पाहायला हवे...चिल ग्रेटा, चिल." या ट्वीटला ग्रेटाने अपल्या ट्विटर बायोमध्ये लिहीले. ग्रेटाने यापूर्वीही अनेक नेत्यांनी तिच्यावर केलेल्या टीकेला आपले स्टेटस म्हणून ठेवले आहे.   

बातम्या आणखी आहेत...