आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After Two Consecutive Flops, Katrina Kaif Said, 'Khan Is Not A Guarantee Of Suicides ...'

इंटरव्यू : सलग दोन फ्लॉप चित्रपटांनंतर कतरिना कैफ म्हणाली - 'खान तिकडी सक्सेसची गॅरंटी नाही...' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : गेल्या वर्षी कॅटरिना कैफने शाहरुख खानसोबत झीरो आणि आमिर खानसोबत 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' मध्ये काम केले होते. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन करू शकले नाहीत. याशिवाय सलमानचा रेस ३ चित्रपटदेखील फ्लॉप ठरला. दैनिक भास्करसोबत नुकत्याच झालेल्या मुलाखतीत कॅटरिना म्हणाली..., खान त्रिकूट सक्सेसची गॅरंटी आहे ही मेड इन मीडिया आहे. चित्रपट निर्मिती सोपे काम नाही, ते वेगवेगळ्या लोकांचा विचार, अप्रोच आणि मेहनतीने बनत असते. एखाद्याला जबाबदार धरू शकत नाही. खान त्रिकूट पाहून किंवा मोठा हीरो पाहून मी कधीच चित्रपट साइन केला नाही. माझ्यासाठी स्क्रिप्ट नेहमी महत्त्वाची होती. 

 

फ्लॉपचे खापर स्वत:वर फोडत नाही 
कॅटरिनाचे गेल्या वर्षी दोन चित्रपट फ्लॉप झाले होते. मात्र या वर्षी तिच्याकडे अनेक चित्रपट आहेत. याविषयी ती म्हणाली..., काही चित्रपट स्क्रिप्ट चांगली नसल्याने फ्लॉप होतात. मात्र मी कधीच स्वत:वर फ्लॉपचे खापर फोडत नाही. मी त्या लोकांसारखी नाही. जे भूतकाळाच्या गोष्टी धरून बसतात. 

 

मजेदार स्क्रिप्टवर बनवणार चित्रपट 
अनुष्का शर्मा, प्रियंका चाेप्रा, दीपिका पदुकोन आणि चित्रांगदा सिंह सारख्या अभिनेत्री निर्मितीत उतरल्या आहेत. आत या यादीत नवे नाव कॅटरिना कैफचे जोडले गेले आहे. कॅटरिनाने स्वत: सांगितले ती निर्मितीत हाज आजमावणार आहे. ती म्हणाली..., होय, मी पुढच्या वर्षी निर्मिती करणार आहे. एखादी मजेदार स्क्रिप्टस मिळाली तर नक्कीच निर्मिती करणार. या स्क्रिप्ट्सच्या वन लायनर आणि आयडियाज मला आवडल्या आहेत. 

 

कोणत्या खानांसोबत किती चित्रपट 
02 शाहरुख सोबत केलेले चित्रपट 
02 आमिर खानसोबत केलेले चित्रपट 
07 सलमान खानसोबत केलेले चित्रपट 

 

प्रश्न-उत्तरे...  
- पुढच्या चित्रपटात विकी कौशलसोबत दिसणार का ? 
मला अजून विकी कौशलसोबत एकाही चित्रपटाची ऑफर आली नाही. 

 

- करिअरमध्ये आता कोणते चित्रपट करू इच्छित आहेस ? 
एक अभिनेत्री म्हणून मी थ्रिलर चित्रपट करू इच्छित आहे. स्पॅनिश चित्रपटासारखे. 

 

- स्त्री प्रधान चित्रपटाविषयी काय मत आहे ? 
स्त्री प्रधान चित्रपटाचा मार्ग अजूनही खडतर आहे. हीरो तर मसाला ते ऑफबीट चित्रपट करतच असतात. मात्र हिरोइनसाठी अजूनही मर्यादा आहेतच. 

 

- एक हिरोइन म्हणून इंडस्ट्रीत अवघड काम काय आहे ? 
'हिरोइनसाठी आजही स्टीरियोटाइप इमेज तोडणे अवघड आहे. निर्माते तर सोडा प्रेक्षकदेखील कधी-कधी आम्हाला स्वीकारत नाही. 
 

बातम्या आणखी आहेत...