आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल दोन वर्षानंतर मोठ्या पडद्यावर परततेय उर्मिला कोठारे, या कलाकारासोबत जमणार आहे ऑन स्क्रिन जोडी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगणा उर्मिला कानेटकर-कोठारे दोन वर्षांच्या ब्रेकनंतर आता मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाली आहे.  संगीतकार, गायक, लेखक आणि दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांच्या आगामी ‘एकदा काय झालं’ चित्रपटातून उर्मिला कमबॅक करत आहे. 2017 मध्ये आलेल्या 'ती सध्या काय करते' या चित्रपटात उर्मिला शेवटची झळकली होती. त्यानंतर तिची मुलगी जीजाचा जन्म झाला. जीजाच्या जन्मानंतर उर्मिलाने काही काळाचा ब्रेक घेतला होता. पण आता ती कमबॅक करतेय. अभिनेता सुमित राघवनसोबत उर्मिला झळकणार आहे. नुकताच मुंबईत या चित्रपटाच्या शूटिंगचा मुहूर्त झाला. 


डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री, राजेश भोसले, प्रतीक कोल्हे, मुक्ता पुणतांबेकर, आकांक्षा आठल्ये आणि रितेश ओहोळ यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. मुहूर्ताला हे सर्व कलाकार उपस्थित होते.  उर्मिलाने तिच्या इन्स्टाग्रामवर सुमीत आणि सलील यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करुन नवीन चित्रपटाची घोषणा केली. 

  • दिग्दर्शक म्हणून सलील यांचा दुसरा चित्रपट...

संगीतकार व गायक डॉ. सलील कुलकर्णी यांची गाणी कायम सदाबहार असतात. पण गाण्याच्या पलिकडे जाऊन सलील यांनी नुकतंच दिग्दर्शनात पदार्पण केलं ते ‘वेडिंगचा शिनेमा’ या मराठी चित्रपटातून. या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन सलील याचं होतं. चित्रपटाने देशात तसंच परदेशात देखील खूप यश मिळवलं. या धमाकेदार मनोरंजनाचं पॅकेज असलेला चित्रपट दिल्यानंतर आता डॉ. सलील कुलकर्णी  ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.

  • नवीन वर्षात चित्रपट येणार भेटीला..

2020 च्या उन्हाळ्यात हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. ‘एकदा काय झालं..’ ह्या नावापासूनच या चित्रपटाचे वेगळेपण जाणवते आणि एका अगदी नवीन कोऱ्या विषयावरचा एक संवेदनशील चित्रपट आपल्याला बघायला मिळेल अशी खात्री वाटते. या चित्रपटाच्या नुकत्याच रिलीज झालेल्या पोस्टरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाची निर्मिती सिद्धार्थ महादेवन, सौमिल शृंगारपुरे आणि सौमेंदु कुबेर यांच्या शो बॉक्स एंटरटेन्मेंटतर्फे आणि अरुंधती दात्ये, अनुप निमकर, सलील कुलकर्णी आणि नितीन प्रकाश वैद्य यांच्या गजवदन प्रॉडक्शन्स तर्फे होत आहे. पहिल्या चित्रपटाप्रमाणेच सलील कुलकर्णी ‘एकदा काय झालं’ मध्येही लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार या विविधांगी भूमिकेत रसिकांसमोर येणार आहे. 

  • वडील-मुलाच्या नात्यावर आधारित चित्रपट

‘एकदा काय झालं’ या चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरवर एक लहान मुलगा आणि एका माणसाची प्रतिमा दिसते. पोस्टरवर वडीलांच्या भूमिकेत सुमीत राघवन दितोय.  त्यावरुन सिनेमा एका बाप-मुलाच्या नात्यावर आधारित असू शकतो असा अंदाज बांधला जाऊ शकतो.