आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बीजिंग - दिवसेंदिवस संरक्षण खर्च वाढवून अमेरिकेला आव्हान देणाऱ्या चीनने मदर ऑफ ऑल बॉम्ब तयरा केला आहे. चीनने या बॉम्बची चाचणी सुद्धा घेतली असून त्याच्या ताकदीचा नमूना संरक्षण मंत्रालयाने दाखवला. चीनच्या सरकारी मीडिया रिपोर्टनुसार, हा बॉम्ब आतापर्यंतचा सर्वात शक्तीशाली आणि विध्वंसक बॉम्ब आहे. उल्लेखनीय बाब अमेरिकेकडे सुद्धा मदर ऑफ ऑल बॉम्ब (MOB) आहे. परंतु, चीन अमेरिकेच्या एक पाऊल पुढे निघाला. अमेरिकेचा मॉब नेण्यासाठी मोठे विमान लागते. परंतु, चिनी मॉब हलक्या लढाऊ विमानांनी सुद्धा कुठेही नेता येऊ शकेल.
ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार, चायना नॉर्थ इंडस्ट्रीज ग्रुप कॉरपोरेशन लिमिटेडने याची चाचणी घेतली. हा बॉम्ब H-6K या बॉम्बवर्षक विमानातून फेकण्यात आला होता. कंपनीने या बॉम्बचा एक व्हिडिओ डिसेंबरमध्येच आपल्या वेबसाइटवर जारी केला. याचा सर्वात चांगला वापर लॅन्डिंग झोन तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो असे चीनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. कुठल्याही संरक्षण मुख्यालयासह किल्ले सुद्धा क्षणार्धात जमीनदोस्त करण्याची ताकद या बॉम्बमध्ये आहे. चिनी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जंगलात सैनिकांना उतरण्यासाठी लॅन्डिंग झोन तयार करण्याकरिता याचा वापर होऊ शकतो. एकदा हा बॉम्ब टाकल्यास संपूर्ण परिसर सपाट होईल आणि लॅन्डिंगची जागा मिळेल.
अमेरिकेने अफगाणिस्तानात पाडले होते MOB
अमेरिकेने आपल्या मदर ऑफ ऑल बॉम्बचा वापर अफगाणिस्तानात आयसिसचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी केला होता. या बॉम्बचे दुसरे नाव GBU-43-b असे आहे. चिनी मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेचे बॉम्ब चीनच्या तुलनेने अधिक जड होते. चिनी MOB अमेरिकेच्या बॉम्बपेक्षा अधिक शक्तीशाली आणि त्यापेक्षा हलके आहे. या बॉम्बचा आकार 5 ते 6 मीटर लांब आहे.
रशियाकडे फादर ऑफ ऑल बॉम्ब
अमेरिकेच्या मदर ऑफ ऑल बॉम्बला टक्कर देण्यासाठी रशियाने त्याहून शक्तीशाली बॉम्ब बनवले. त्याला फादर ऑफ ऑल बॉम्ब असे नाव देण्यात आले आहे. रशियाच्या बॉम्बचे वैशिष्ट्य म्हणजे, यातून कंपन होत नाही. तर एक आगीचा मोठा गोळा तयार होता. यात येणारी प्रत्येक गोष्ट भस्म होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.