आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • After Winning The Gold, There Is No Indian Flag On The Podium,Sad Thing For Us : Deepika

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुवर्ण जिंकल्यानंतर पोडियमवर भारतीय तिरंगा नसल्याने आमच्यासाठी दु:खद गोष्ट : दीपिका

एका वर्षापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • ऑलिम्पिकमध्ये महिला गटात आतापर्यंत एक कोटा मिळाला
  • भारतीय तिरंदाजी फेडरेशनवर बंदी असल्याने भारतीय खेळाडू त्रयस्थ म्हणून मैदानात
  • आशियाई चॅम्पियनशिपमध्ये दीपिकाकुमारीने रिकर्व्ह प्रकारात जिंकले सुवर्ण

​​​​​​भोपाळ : तिरंदाज दीपिका कुमारीने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. मात्र, ती पोडियमवर गेल्यावर भारतीय तिरंगा नव्हता आणि राष्ट्रगीतही वाजवण्यात आले नाही. कारण, भारतीय तिरंदाजी फेडरेशनवर बंदी असल्याने आमचे खेळाडू त्रयस्थ म्हणून स्पर्धेत उतरले आहेत.रिकर्व्ह प्रकारातील चॅम्पियन दीपिकाने म्हटले की, सुवर्ण जिंकल्यानंतर पोडियमवर तिरंगा नसल्याने आमच्यासाठी लाज वाटेल, दुःखद अशी घटना होती. चुकी कोणाची ही असो, असे व्हायला नको. हा आमच्यासाठी गर्वाची बाब असते. येथे आम्हाला आमच्या देशाचे नाव देखील ऐकायला मिळाले नाही. पदक जिंकून भारतात परतल्यानंतर दीपिकाशी झालेला संवाद थोडक्यात....

िरकर्व्ह प्रकारात आशियाई खेळाडू पुढे, त्यामुळे आव्हान सर्वाधिक... 

स्पर्धेचा अनुभव कसा राहिला, कोणत्या देशाकडून आव्हान मिळाले?


अशियाई स्पर्धा खुप कठीण असते. कारण रिकर्व्ह प्रकारात येथील खेळाडूंचा दबदबा आहे. तैवान, चीन, कोरिया व जपान सर्वच चांगले प्रदर्शन करतात. इतर काही देशांचे खेळाडू देखील उत्कृष्ट प्रदर्शन करतात. अंतिम लढतीदरम्यान खुप हवा होती. त्यावेळी अंदाज लावून तुम्हाला लक्ष्य भेद करावा लागतो. तरच तुम्ही यश मिळवू शकतात.

महिला गटातील पहिला कोटा होता, आणखी किती कोटा मिळू शकतात?


आमच्याकडे आणखी एक संधी आहे. जूनमध्ये बर्लिन विश्वचषक स्पर्धा होईल. आता आपल्याकडे तयारीसाठी सहा महिने आहेत. इतर प्रकारात देखील कोटा मिळवण्यात आपण यशस्वी ठरू शकतो.

काेरियाचे खेळाडू आपल्याला नेहमी आव्हान देतात, त्यासाठी काही विशेष तयारी?


कोरिया मोठ्या स्पर्धेत चांगले प्रदर्शन करते. मात्र, त्याच्या सोबत आम्हाला इतर देशांच्या संघांशी देखील खेळावे लागते. अशात केवळ त्यांच्यावर लक्ष्य केंद्रित होत नाही. प्रत्येक स्पर्धेत आपले १०० टक्के देण्याचा प्रयत्न असतो.

ऑलिम्पिक वर्ष सुरू होणार असल्याने काही विशेष नियोजन आहे का?


माझ्याकडून संपूर्ण तयारी आहे. स्वत:मध्ये आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न करतेय. चाचणीसह अनेक स्पर्धा खेळायच्या आहेत. त्यासाठी संपूर्ण संघाचीच तयारी सुरू आहे.

फेडरेशनमध्ये दोन गट, त्यामुळे आंतरराष्ट्रीय संघटनेकडून भारतीय फेडरेशन निलंबित
 
क्रीडा मंत्रालयाकडून बंदी असलेल्या तिरंदाजी संघटनेचे सचिव वीरेंद्र सचदेवा यांनी म्हटले की, २० डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्यानंतर पुढील वर्षी जानेवारीपर्यंत संघटनेची निवडणूक होऊ शकते. आपल्यातील गटबाजीमुळे आंतरराष्ट्रीय संघटनेने फेडरेशनला निलंबित केले. त्यामुळे दक्षिण आशियाई स्पर्धेत टीम खेळली नाही. सध्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पदक भारताच्या नावे मिळत नाही. बंदी हटल्यानंतरच आपल्या देशाच्या नावे पदक लागेल. संघटनेवर बंदी घातल्यानंतर खेळाडूंना दोन वेळा निवड चाचणीमध्ये सहभागी व्हावे लागले होते. अनेक मोठ्या स्पर्धेत खेळाडूंना सहभागी देखील होता आले नव्हते.