आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा नव्या आव्हानात्मक शोधात निघालो : मोहम्मद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही अभिनेता मोहम्मद नाजिमने बहू बेगम' मालिका सोडली आहे. मालिकेत नाजिम असगर मिर्झाची भूमिका साकारत होता. यात तो काहीतरी वेगळे करण्याच्या विचारात होता मात्र त्याच्या मनासारखे त्याला करता आले नाही, त्यामुळे त्याने मालिका सोडली, या आणि इतर विषयांवर त्याच्याशी झालेली चर्चा...

असगर मिर्झाची भूमिका करण्याचा अनुभव कसा राहिला ? 
हा एक चांगला अनुभव होता. माझ्या मते, काम चांगलेच असते. हो काहीतरी वेगळे करायचे होते. खरं सांगायचे झाले तर मी शोदरम्यान ज्या गोष्टींबद्दल विचार केला हाेता तसे काही झाले नाही, पण अनुभव खरोखर चांगला होता. आता हे पात्र संपले अाहे, मात्र त्याशी संबंधित आठवणीही खास आहेत. यापूर्वी कोणीही असगर मिर्झासारखी भूमिका केली नव्हती. मी हे पात्र नव्या पद्धतीने साकारले आहे. या पात्रासाठी मी दाढी वाढविली आणि मला माझा संपूर्ण लुक बदलावा लागला. मला काहीतरी वेगळे करण्याची संधी मिळाली, त्यासाठी मी खूप आनंदी आहे. मी पहिल्यांदाच मुस्लिम मुलाची भूमिका केली होती. माझ्यासाठी हे काहीसे सोपे झाले आहे कारण मी स्वतः एक मुस्लिम आहे, बहुतेक गोष्टी मला आधीपासूनच माहित होत्या. 

तु सकारात्मक भूमिकेबरेाबरच नकारात्मक भूमिकादेखील केल्या अाहेस. काेणते पात्र तुला अावडले ॽ
आजच्या जगात भूमिका कुठलीही असो, काम करणे फार महत्वाचे आहे. मग ती सकारात्मक भूमिका असो किंवा नकारात्मक. मी म्हटल्याप्रमाणे काम म्हणजे कामच असते. हे सर्व भूमिकेच्या वैशिष्ट्यांवर अवलंबून असते, तुम्ही सकारात्मक-नकारात्मक करता, पण ते माझ्यासाठी एक आव्हान बनले अाहे ते मी नक्कीच करेन. असगर मिर्झाच्या व्यक्तिरेखेत काहीच आव्हानात्मक नसते तर पात्र मेले असते. आता मी पुन्हा नव्या आव्हानात्मक भूमिकेच्या शोधात निघालाे आहे.

सकारात्मक किंवा नकारात्मक कोणती भूमिका अवघड आहे ?
नकारात्मक भूमिकेत तुमच्याकडे खूप गोष्टी असतात. चित्रपटांप्रमाणेच टीव्हीवरही बरेच काही करता येते. परंतु चित्रपटासारखी दृश्ये अनेकदा करता येत नाहीत. टीव्हीमध्ये अभिनेत्याला अनेक वेगवेगळ्या छटा दाखवण्याची संधी मिळत असते.

शेवटी, आपल्या आईबद्दल काय सांगणार? 
जोपर्यंत ती या जगात होती, तोपर्यंत ती माझ्या अगदी जवळ होती. ती इतक्या लवकर आम्हाला सोडून जाईल, असे कधीही वाटले नव्हते. ती माझ्यासाठी काय ते मी शब्दात सांगू शकत नाही.