• Home
  • Gossip
  • Again the rumor about Priyanka chopra's pregnancy gets viral, Hollywood actress wrote in a comment on priyanka's photo 'Hot Mom'

कान्स फिल्म फेस्टिव्हल / अंदाज : कान्समध्ये डेब्यूनंतर उडाली प्रियांकाच्या प्रेग्नन्सीची अफवा, हॉलिवूड अभिनेत्रीने फोटोवर कमेंटमध्ये लिहिले - 'हॉट मॉम'

कान्समध्ये दिसले वाढलेले पोट... 

दिव्य मराठी वेब टीम 

May 19,2019 03:56:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : प्रियांका चोप्राने कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये डेब्यू केला आहे. रेड कार्पेटवर वॉक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती पती निक जोनससोबत चोपर्ड ज्वेलरी ब्रॅण्डच्या पार्टीमध्ये सामील झाली. दोन्ही दिवस तिने जो ड्रेस घातला होता त्यामध्ये प्रियांकाचे बेली फॅट स्पष्टपणे दिसत होते. तिचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होताच एकदा पुन्हा तिच्या प्रेग्नन्सीची चर्चा वाढली आहे. यासोबतच हॉलिवूड अभिनेत्रीच्या फोटोजवर आलेल्या कमेंटमुळे हा संशय वाढला आहे.

हॉलिवूड अभिनेत्री ओक्टाविया स्पेंसरने केले कमेंट...
झाले असे की, प्रियांकने कान्सचा लुक आपल्या इंस्टाग्रामवर शेयर केला. या फोटोजवर तिची चांगली मैत्रीण आणि हॉलिवूड अभिनेत्री ओक्टाविया स्पेंसरने कमेंट करून लिहिले, 'स्टनिंग ममासिटा' इंग्रजीमध्ये याचा अर्थ होतो हॉट मॉम. ओक्टावियाचे कमेंट प्रियांकाच्या प्रेग्नन्सीच्या संशयाला अजून बळावते.

कान्समध्ये दिसले वाढलेले पोट...
रेड कार्पेटवर प्रियांकाने ब्लॅक आणि रोज गोल्ड कलरचा शिमरी गाउन घातला होता. या ड्रेसमध्ये तिचे पोट थोडे वाढलेले दिसत आहे. त्यांनतर जेव्हा ती पतीसोबत ब्लू सॅटीनच्या गाउनमध्ये दिसली. तर या ड्रेसवरही तिने मोठा रुंद लेस बेल्ट घातला होता. असे वाटत आहे की, तिला तिचे पोट लपवायचे आहे. तसेच जेव्हा ती चोपर्डच्या पार्टीमध्ये पोहोचली तेव्हा तिने पर्पल कलरचा ड्रेस घातला होता, ज्यामध्ये तिचे वाढलेले पोट स्पष्ट दिसले. मात्र यापूर्वी जेव्हा प्रियांकाच्या प्रेग्नन्सीच्या बातम्या आल्या होत्या, तेव्हा तिची आई मधु चोप्राने याचे खंडन केले होते.

X
COMMENT