आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा भडकला हिंसाचार आणि जाळपोळ; नागरिकांनी केला तृणमूलवर मतदान करण्यापासून रोखल्याचा आरोप...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता(पश्चिम बंगाल)- लोकसभा निवडणूक 2019 च्या शेवटच्या टप्प्यातील मतदानादिवसी पुन्हा एकदा बंगालमध्ये हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. गाड्या जाळण्यापासून ते बॉम्ब फेकण्यापर्यंत येथील लोकांची मजल गेली आहे. आज(19 मे) मतदानाच्या दिवसीशी टीएमसी आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. इतकच नाही तर, बशीरहाटमध्ये मतदान करण्यासाठी लोकांना पोलिंग बुथच्या बाहेर प्रदर्शन करावे लागले. हिंसाचारासाठी भाजपने तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जबाबदार ठरवले आहे. त्यासोबतच भाजपने टीएमसीच्या कार्यकर्त्यांवर आपल्या नेत्यांना मारहाण केल्याचा आरोप लावला आहे.


या सर्व हिंसाचारादरम्यान पोलिसांना टीएमसी नगरसेवक सुभाष बोसला ताब्यात घ्यावे लागले तर भाजप नेते अनुपम दत्ता यांना नजरकैदेत ठेवावे लागले. भाजपने तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर नागरिकांना मतदान करण्यापासून थांबवल्याचा आरोप लावला आहे. जाधवपूरमधून भाजप उमेदवार अनुपम हाजरा यांनी आरोप लावला आहे की, टीएमसीच्या गुंडांनी त्यांच्या कारवर हल्ला करून ड्रायव्हरला मारहाण केली.


पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यापासून शेवटच्या टप्प्यापर्यंत हिंसाचार भडकला आहे. यापूर्वीही 6 वेळेस भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात बंगालमधील 9 जागेंसाठी मतदान होते आहे. यात कोलकाता उत्तर, कोलकाता दक्षिण, दमदम, बारासात, बशीरहाट, जादवपूर, डायमंड हार्बर, जयनगर(एससी) आणि मथुरापूर(एससी) या मतदारसंघांचा समावेश आहे.


हिंसा थांबवण्यासाठी आणि शांतीत मतदान पार पाडण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय सुरक्षा दलांच्या 710 तुकड्या आणि राज्य पोलिसांना तैणात करण्यात आले आहे. इतके करूनही शेवटच्या दिवशी हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. बशीरहाटच्या 189 पोलिंग बूथ नंबरच्या बाहेर नागरिकांनी प्रदर्शन केले आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर मतदानापासून रोखल्याचा आरोप केला आहे.
 

बातम्या आणखी आहेत...