आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल विरोधात गेला, महिलेकडून अपर जिल्हाधिकाऱ्यास मारहाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - जमिनीच्या वादात पैशाची मागणी करून आपल्याविरोधात निकाल दिल्याचे सांगून एका महिलेने अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठी चापट मारली. याप्रकरणात संबंधित महिलेने पोलिसांत तक्रार दिली असून, त्यात अपर जिल्हाधिकाऱ्यांनीच आपल्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. तालुका जालना पोलिस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी आलेल्या या परस्परविरोधी तक्रारीमुळे ठाण्यात गर्दी झाली होती. 


अपर जिल्हाधिकारी प्रकाश खपले हे शासकीय कार्यालयातून प्रवेशव्दाराजवळील वाहनाजवळ आले असता, एका महिलेने त्यांना अडवून पाठीवर चापट मारली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तालुका जालना पोलिस ठाण्यात  महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे तक्रारदार महिलेने जाफराबाद येथील जमिनीशी संबंधित एका प्रकरणाची सुनावणी अपरजिल्हाधिकारी पी. बी. खपले यांच्याकडे सुरू आहे.

 

या प्रकरणात शुक्रवारी न्यायदानाच्या कामानिमित्त ही महिला खपले यांच्या दालनात आली होती. सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास कामकाजाच्या दालनामधून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या शासकीय वाहनाकडे जात असताना या महिलेने रस्ता अडवून शासकीय कामात अडथळा निर्माण त्यांच्या पाठीत चापट मारली असे खपले यांनी म्हटले आहे. या प्रकारानंतर तालुका ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून सदर महिलेसह तालुका पोलिस ठाण्यात आणले. दरम्यान, संबंधित महिलेने पोलिसांत तक्रार दिली. त्यात अपर जिल्हाधिकाऱ्यांनी ५० हजार रुपये घेऊनही आपल्याविरोधात निकाल देऊन आपल्याशी उद्धटपणे वागणूक दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 


५० हजारांची मागणी
जमिनीच्या प्रकरणात माझ्या बाजूने निकाल देण्यासाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांनी ५० हजार रुपयांची मागणी केल्याचे तक्रारदार महिलेने सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...