आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय अाता 65 वर्षे: राज्यात 2 लाख सेविका,मदतनिसांना लाभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्याच्या निर्णयास मंगळवारी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. काम करण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम कर्मचाऱ्यांना याचा लाभ हाेईल. राज्यात २ लाख कर्मचारी अंगणवाडी सेवेत कार्यरत आहेत.  


अंगणवाडी कर्मचारी सेवा समाप्तीचे वय ६० वर्षे करणे, मानधन वाढीचा जीअार २३ फेब्रुवारीला काढला हाेता. मात्र, सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्याची मागणी विधिमंडळाच्या  अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाली हाेती. 


१ डिसेंबर २०१८ला ६० वर्षे पूर्ण केलेल्या सेविका-मदतनिसांची वैद्यकीय तपासणी करून त्या काम करण्यास पात्र असल्याबाबतचे सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच त्यांना सेवेत ठेवण्यात येणार आहे. शासनाने विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार ६० वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर आणि ६३ वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर असे दोन वेळा वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार प्रथमत: तीन वर्षे म्हणजे वयाची ६३ वर्षे पूर्ण होईपर्यंत आणि त्यानंतर दाेन वर्षे म्हणजे ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत काम करता येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...