आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीआयसारखी एजन्सी लोकपालच्या कक्षेतच हवी: अण्णा हजारे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर -‘देशातील भ्रष्टाचार राेखण्याच्या उद्देशाने देश सीबीआयकडे सकारात्मक दृष्टीने बघत आहे. परंतु सध्या सीबीआय अधिकाऱ्यांतील वादविवादाच्या बातम्या येत आहेत. लोकशाहीसाठी ही मोठी चिंतेची बाब आहे. दिवसेंदिवस भ्रष्टाचार वाढत आहे. भ्रष्टाचार हा देशाचा महारोग बनला आहे. परंतु सत्ताधारी याबाबत अजिबात गंभीर नाहीत. तसे असते तर सीबायआयसारख्या संस्थेत तू तू-मैं मैं झालीच नसती. त्यामुळे अशा एजन्सी लोकपालच्या कक्षेत असायला हव्यात,’ असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे व्यक्त केले.  


‘प्रत्येक क्षेत्रात वाढलेला भ्रष्टाचार हे देशासमाेरील मोठे संकट आहे. परंतु सरकार व राजकीय पक्ष हे आव्हान स्वीकारत नाहीत. भ्रष्टाचार थांबवण्यासाठी सर्वोच्च स्वायत्त व सर्वकालीन व्यवस्था गरजेची आहे. जनतेने आंदोलन करून सरकारला कायदा करण्यास भाग पाडल्याचे ते म्हणाले. 

 

लाेकपालसाठी दबाव अाणण्याची गरज  
लोकपाल कोणत्याही मुद्द्यावर पंतप्रधान असो वा त्यांच्या मंत्र्यांची उच्चस्तरीय चौकशी करू शकतात. त्यामुळे आपल्या देशात लोकपालची गरज आहे. परंतु सरकार याबाबत सकारात्मक नाही. त्यासाठी जनतेने सरकारवर दबाव आणला पाहिजे. जनता जागृत झाली व शांततापूर्ण मार्गाने रस्त्यावर आंदोलनासाठी उतरली, तर सरकार कोणत्याही पक्षाचे असो, त्यांना जनहित व देशहिताकरिता निर्णय करावा लागेल’.

बातम्या आणखी आहेत...