आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी इंडस्ट्रीतील या प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी आहे 'अग्गबाई सासूबाई'मधील मॅडी, जाणून घ्या तिच्याविषयी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः सध्या छोट्या पडद्यावर 'अग्गबाई सासूबाई' ही मालिका प्रचंड गाजत आहे. या मालिकेतील आसावरी, अभिजीत राजे, आजोबा, शुभ्रा, सोहम, विश्वास, प्रज्ञा या व्यक्तिरेखांसोबतच मॅडी ही व्यक्तिरेखा लक्षात राहते. ही व्यक्तिरेखा साकारणा-या अभिनेत्रीचे नाव आहे भक्ती रत्नपारखी. कोण आहे भक्ती जाणून घेऊयात...

प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी आहे भक्ती...
भक्ती रत्नपारखी हिने 'अग्गबाई सासूबाई' या मालिकेपुर्वी अनेक मालिका आणि रिअॅलिटी शोजमध्ये काम केले आहे. ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या रिअॅलिटी शोमधून ती घराघरांत पोहोचली आहे. याशिवाय तिने 'तू अशी जवळी राहा' या मालिकेतही महत्त्वाची भूमिका वठवली आहे.

खासगी आयुष्यात भक्ती विवाहित असून तिचे पती मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. निखिल रत्नपारखी हे भक्तीच्या पतीचे नाव आहे. निखिल यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांत विनोदी भूमिका साकारल्या आहेत. निखिल यांनी ‘ओह माय गॉड’, ‘पहेली’, ‘जयंताभाई कि लव्हस्टोरी’ यासारख्या हिंदी चित्रपटांत काम केलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी ‘नारबाची वाडी’, ‘व्हेंटिलेटर’, ‘सुपरस्टार’ यासारख्या मराठी चित्रपटांत काम केलेले आहे. त्याच बरोबर त्यांनी अनेक टीव्ही शो आणि जाहिरातीत सुद्धा काम केलेले आहे.

सोशल मीडियावर अॅक्टिव आहे भक्ती... 
मालिकेमध्ये अल्लड आणि खोडसाळ दिसणारी मॅडी खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड सुंदर दिसते. भक्ती सोशल मीडियावर अॅक्टिव आहे.  

बातम्या आणखी आहेत...