Home | International | Other Country | agitation for bread in sudan

ब्रेडचे दर वाढल्याने आंदोलन, तरुणी बनली प्रतीक

वृत्तसंस्था | Update - Apr 11, 2019, 01:46 PM IST

सुदानमधील ब्रेड महागल्यानंतरच्या आंदोलनाचे नेतृत्व एक तरुणी करत असून तिच्या भाषणामुळे आंदोलकांचा उत्साह वाढला...

  • agitation for bread in sudan

    खार्तोम - सुदानमधील ब्रेड महागल्यानंतरचे आंदोलन अनेक महिन्यांनंतरही सुरूच आहे. आता या आंदोलनाचे नेतृत्व एक तरुणी करत असून त्यांच्या भाषणामुळे आंदोलकांचा उत्साह वाढल्याचे दिसून आले. लष्कराच्या मुख्यालयासमोर सलग पाचव्या दिवशी आंदोलन सुरू होते. ही तरूणी या आंदोलनाची प्रतीक बनली आहे. २२ वर्षीय सालाह पांढऱ्या रंगाच्या साडीसारख्या पारंपरिक पाेशाखात तडाखेबंद भाषण करते. तिला नुबिन क्विन असे संबोधले जात आहे. प्राचीन सुदानमध्ये नुबिन क्विन अशाच महिलांना संबोधले जायचे. अशा धाडसी महिला स्वत:च्याच नव्हे, तर इतरांच्या हक्कासाठीही संघर्ष करतात, असे मानले जाते. सुदानमध्ये वाढती महागाई, कुशासनाविरोधात पाच दिवसांपूर्वी लष्कराच्या मुख्यालयास घेराव घालण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यानंतर रविवारी हजारो निदर्शक तेथे जमले होते. त्यांना हटवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. राष्ट्रपती ३० वर्षांपासून सत्तेवर आहेत.त्यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम आहेत.राष्ट्रपती उमर अल-बशीर यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी विरोधी नेते, पत्रकार तसेच हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शने केली होती.


    ब्रेडचे दर वाढल्यापासून संताप :
    १९ डिसेंबर रोजी सुदानच्या जनतेने निदर्शने केली. सरकारने ब्रेडचे दर तिपटीने वाढण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा ब्रेड पाच रुपये करण्यात आली. आधी एक ब्रेड दोन रुपयांना मिळत होता. त्यावरून विविध ठिकाणी हिंसाचार झाला होता. त्यात ५१ जण मृत्युमुखी पडले होते. देशात महागाई प्रचंड वाढल्याने भोजनाच्या थाळीसाठी ३११ रुपये मोजावे लागतात. चिकन-३०० किलो, टोमॅटो-९० रुपये किलो, अंडी- ७० रुपये डझन, सफरचंद-३०५ रुपये किलो अशी दरवाढ झाली.

Trending