आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात स्थिर सत्ता स्थापन करण्यासाठी औरंगाबादेत जिल्हा शैक्षणिक व्यासपीठातर्फे सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - निवडणुकीचा निकाल येऊन 20 दिवस झाले. जनतेने भाजप-शिवसेना युतीला जनादेश देखील दिला. मात्र अद्याप राज्यात स्थिर सरकार स्थापन होऊ शकले नाही. एकाही पक्षाला बहुमत सिद्ध न करता आल्यामुळे अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली. यामुळे राज्यात स्थिर सरकार स्थापन करावे या मागणीसाठी औरंगाबाद जिल्हा शैक्षणिक व्यासपीठातर्फे शहरातील क्रांती चौकात सर्वपक्षीय स्थिर सरकार आंदोलन करण्यात आले. राज्यात कोणाही सरकार स्थापन करा मात्र आम्हाला स्थिर सरकार द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. भर पावसात मतदान केले सांगा आम्ही काय पाप केले, अतिवृष्टीमुळे नुकसान झाले तरी आम्ही मतदान केले अशाप्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.  
20 दिवस झाले तरी राज्यात अद्याप सरकार स्थापन झाले नाही. पर्यायाने राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली. स्थिर सरकार स्थापन व्हावे याकरिता जनतेने ज्या विश्वासाने मतदान केले त्यांच्या विश्वासाला तडा बसला आहे. निवडणुकीसाठी शासनाने अंदाजे 900 कोटी रूपये खर्च केल्याची माहिती आहे. सत्ता स्थापनेपुढे राज्यातील अनेक विषय मागे पडले आहेत. अतिवृष्टी भीषण पुरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. यामुळे राज्यात लवकरात लवकर स्थिर सरकार स्थापन व्हावे, राष्ट्रपती राजवट व फेर निवडणुका राज्याला परवडणाऱ्या नाहीत यासाठी औरंगाबाद जिल्हा शैक्षणिक व्यासपीठातर्फे सर्वपक्षीय स्थिर सरकार आंदोलन करण्यात आले. 

 

बातम्या आणखी आहेत...