Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Agitators arrested in front of Guardian's house

पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्यांना अटक

प्रतिनिधी | Update - Dec 08, 2018, 09:40 AM IST

प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांना अटक करून पोलिसांनी आंदोलन मोडले.

  • Agitators arrested in front of Guardian's house

    जामखेड - पालकमंत्री राम शिंदे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या विधानाचा निषेध करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अठरा आंदोलकांना पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी अटक करून नंतर सोडून दिले. चोंडी येथील मंत्री शिंदे यांच्या निवासस्थानाभोवती मोठा बंदोबस्त तैनात आहे. शीघ्र कृती दलाला तेथे पाचारण करण्यात आले.


    राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येताच त्यांना अडवण्यात आले. प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांना अटक करून पोलिसांनी आंदोलन मोडले. अक्षय शिंदे, नगरसेवक अमित जाधव, गणेश हगवणे, श्याम कानगुडे, नितीन हुलगुंडे, नितीन धांडे, शहाजी राळेभात, अमजद पठाण, कैलास हजारे यांना अटक करून सोडून देण्यात आले. या वेळी प्रा. मधुकर राळेभात, शहाजी राळेभात, संभाजी राळेभात, शरद शिंदे, अमजद पठाण, सुरेश भोसले, डॉ. कैलास हजारे, वैजीनाथ पोले, हनुमंत पाटील, नरेंद्र जाधव, नितीन हुलगुंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

    शेतकऱ्यांबद्दल बेताल वक्तव्य करून त्यांचा अपमान हे आंदोलन मागे घेण्यात येईल; अन्यथा राष्ट्रवादी संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा मासाळ यांनी दिला. शेतकऱ्यांची माफी मागावी; अन्यथा फिरू देणार नाही, असा इशारा अक्षय शिंदे यांनी दिला.

Trending