Home | Business | Industries | agreement between sharp and salora

शार्प आणि सलोराचा करार

वृत्तसंस्था | Update - May 29, 2011, 01:34 AM IST

घरगुती वापराची विजेची उपकरणे बनविणाऱया सलोरा इंटरनॅशनल कंपनीने जपानच्या शार्प कार्पोरेशन लिमिटेडसोबत एक करार केला आहे.

  • agreement between sharp and salora

    नवी दिल्ली - घरगुती वापराची विजेची उपकरणे बनविणाऱया सलोरा इंटरनॅशनल कंपनीने जपानच्या शार्प कार्पोरेशन लिमिटेडसोबत एक करार केला आहे. शार्प बिझनेस सिस्टम्स या भारतीय युनिटसोबत हा करार झाला आहे. उभय कंपनीमध्ये झालेल्या करारानुसार शार्पचे मायक्रोवेव्ह ओव्हन, व्हॅक्यूम क्लीनर आणि घरगुती वापराच्या इतर वस्तूंची विक्री सलोराला करावी लागणार आहे. याशिवाय शार्पच्या सीआरटी टीव्हीला उत्तर भारतात आणण्याचेही या करारात सुनिश्चित करण्यात आले आहे. याशिवाय इतर उत्पादनांच्या विक्रीचाही या करारामध्ये समावेश करण्यात आला आहे.

Trending