आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळी बीड जिल्ह्याला बारामतीकरांचा असाही दिलासा, अॅग्रिकल्चर ट्रस्टने दिले ४० हजार लिटर क्षमतेचे २१ पाण्याचे टँकर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आष्टीमार्गे बीड तालुक्यातील नवगणराजुरी येथे आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांकडून पिण्याच्या पाण्याची परिस्थिती समजून घेतली होती. दुष्काळाच्या संकटात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करू, असे आश्वासन त्यांनी दिले होते. पवारांनी दिलेला शब्द पाळत अॅग्रीकल्चर ट्रस्ट  बारामती मार्फत पहिल्या टप्प्यात ४० हजार लिटर क्षमतेचे  २१ टँकर मोफत पाणी पुरवठ्यासाठी पाठवले. २१ टँकर्सची  दहा लाख लिटर पाणी क्षमता असून  हे टँकर जिल्ह्यातील १०० गावांची  दररोज  तहान भागवण्यासाठी  रवाना करण्यात आले आहेत.  


गुरुवारी बीड शहरातील यशवंत पॉलिटेक्निक कॉलेजच्या परिसरात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते  रोहित पवार व संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते  श्रीफळ  फोडून टँकरचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित,  माजी आमदार सुनील धांडे, मनोहर डाके, माजी आमदार उषा दराडे, अॅड. हेमा पिंपळे, बाळासाहेब आजबे, चंपावती  पानसंबळ,  सतीश शिंदे, महेंद्र गर्जे, जयसिंग सोळंके आदी उपस्थित होते.


साहेबांनी शब्द पाळला  
बीड जिल्ह्यात आल्यानंतर साहेबांनी छावण्यांवर जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करत जनावरांमागे  दिल्या जाणाऱ्या अनुदानाची माहिती घेतली. पाणी पुरवठा होत असलेल्या टँकरमधील पाणी पिण्यायोग्य नसल्याचे शेतकऱ्यांनी पवारांना सांगितले होते. त्यावेळीच पाण्यासाठी टँकर देणार असल्याचा शब्द त्यांनी दिला होता. आज टँकर सुरू केले असून अॅग्रीकल्चर ट्रस्ट बारामती मार्फत मदत केली जात आहे. 
-रोहित पवार, युवक नेते, राष्ट्रवादी काँग्रेस, बारामती


रोहित पवारांनी दुष्काळी परिस्थिती अनुभवली 
युवक नेते रोहित पवार व संदीप क्षीरसागर यांनी सुरुवातीला एचआयव्हीसह जगणाऱ्या आनंदवनला भेट देऊन या प्रकल्पातील मुलांशी संवाद साधत मुलांसाठी इ लर्निंगचे किट देण्याचे आश्वासन दिले. यावेळी आनंदवन प्रकल्पाचे संचालक दत्ता बारगजे व संध्या बारगजे  यांनी पवार यांचे स्वागत केले. त्यानंतर पवार यांनी बिंदुसरा प्रकल्पाला भेट देऊन टँकरची माहिती घेतली. तेव्हा शेतकऱ्यांनी गाळयुक्त पाणी मिळत असल्याचे सांगितले. 
 

बातम्या आणखी आहेत...