आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईच्या शासकाची हरवलेली राजकुमारी परत देऊन भारतात आणला ऑगस्ता वेस्टलँडचा डीलर ख्रिश्चियन मिशेल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ऑगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहारातील डीलर आणि आरोपी ख्रिश्चियन मिशेलला भारतात कसे आणले यासंदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. संयुक्त अरब अमिरातच्या शासकांची मुलगी गतवर्षी घरातून बेपत्ता झाली होती. भारताने तीच राजकुमारी दुबईला परत पाठवली. अर्थातच दुबई शासकाच्या मुलीच्या बदल्यात ब्रिटिश आर्म्स डीलर मिशेलचा सौदा करण्यात आला असा दावा द संडे टेलिग्राफने केला आहे. दुबईतून सागरीमार्गे ती पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. याच दरम्यान भारतीय नौदलाने तिला ताब्यात घेतले होते. 


राजकुमारीला फ्रान्सच्या गुप्तहेराने केली होती मदत
यूएईची राजकुमारी लतिफा आपली मैत्रीण टीना जोहियाने हिच्यासोबत याटमध्ये बसून पसार झाली होती. फ्रान्सच्या गुप्तचर अधिकाऱ्याने तिची मदत केली होती. देशातून पळून जाण्यासाठी तिने आपला वेश देखील बदलला होता. ती शेवटच्या वेळी मार्च महिन्यात भारतीय अधिकाऱ्यांसोबत संयुक्त अरब अमिरातमध्ये दिसून आली होती. त्यानंतरच ती पसार झाली. काही माध्यमांनी त्यावेळी जारी केलेल्या वृत्तानुसार, ती दुबईतून सागरीमार्गे निघाली होती. परंतु, ऐनवेळी तिला भारतीय नौदलाने ताब्यात घेतले होते. घरात डांबून ठेवले जात असल्याने आणि विविध प्रकारच्या निर्बंधांना कंटाळून तिने हा निर्णय घेतला होता. परंतु, तिच्या कुटुंबियांनी यासंदर्भात कधीही अधिकृत माहिती जारी केली नव्हती. काही माध्यमांनी ती मानसिक रुग्ण असून तिच्यावर उपचार सुरू असल्याचा दावा केला होता.


ख्रिश्चियन मिशेलवर हेलिकॉप्टर डीलमध्ये गुन्हेगारी स्वरुपाच्या षडयंत्राचे आरोप आहेत. यासंदर्भातील आरोपपत्रात माजी हवाई दल प्रमुख एसपी त्यागी आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचा आणि बड्या अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. या सर्वच अधिकाऱ्यांनी आपल्या पदांचा गैरवापर करून व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टरची स्पेसिफिकेशन बदलून 44 लाख कोटींचा करार करून घेतला. यूपीए-2 च्या सरकारमध्ये संरक्षण मंत्रालयाने 8 फेब्रुवारी 2010 रोजी 12 व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टरच्या कराला मंजुरी दिली होती. मिशेल 1980 पासून या कंपनीसाठी काम करत होता. त्याचे वडील सुद्धा भारतासाठी ब्रिटनच्या संरक्षण करारांचे सल्लागार होते. मिशेलनेच या करारात मध्यस्थाची भूमिका निभावली होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर यूपीए-2 सरकारने करार रद्द केला. तसेच 2016 मध्ये माजी हवाई दल प्रमुख त्यागी यांना अटक करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...