Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Ahemdabad-Jalgaon-Mumbai Flight Service Shortly

अहमदाबाद- जळगाव- मुंबईसाठी 70 आसनांचे विमान लवकरच घेणार उड्डाण

प्रतिनिधी | Update - Feb 08, 2019, 12:05 PM IST

दोन रुटची विमानसेवा असल्याने कंपनीतर्फे 70 आसनी जेट विमानाद्वारे ही सेवा पुरवली जाणार आहे.

 • Ahemdabad-Jalgaon-Mumbai Flight Service Shortly

  जळगाव- ट्रू जेट या विमान कंपनीला जळगाव- अहमदाबाद विमानसेवा देण्यासाठीची परवानगी गेल्या ऑक्टोबर महिन्यात मिळालेली आहे. त्यापाठोपाठ याच कंपनीला आता जळगाव-मुंबई विमान सेवेचेही परवानगी मिळालेली आहे. अहमदाबाद-जळगाव- मुंबई असा ट्रँगल पूर्ण झाल्याने त्याचा अधिक जणांना लाभ होऊन ही सेवा अखंडित राहील, असे जाणकाराना वाटते. दोन रुटची विमानसेवा असल्याने कंपनीतर्फे 70 आसनी जेट विमानाद्वारे ही सेवा पुरवली जाणार आहे. दरम्यान, ही सेवा केव्हा सुरू होईल, याबाबत कंपनीकडून संकेतस्थळावरच अधिकृतपणे जाहीर करण्यात येईल, असे कंपनीच्या ग्राहक सल्ला केंद्रातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

  पंतप्रधान यांच्या सामान्यांना विमानसेवा या संकल्पनेतून उड्डाण ही देशातील लहान शहरांना महानगरांशी जोडण्याच्या योजनेतंर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच शहरात जळगाव शहराचा समावेश करण्यात आला होता. गेल्यावर्षी 26 डिसेंबर रोजी ही विमान सेवा सुरू झाली होती. एअर डेक्कन चॉर्टर्डस सर्व्हिसेस या कंपनीतर्फे काही महिने अनियमितपणे ही सुविधा देण्यात आली. त्यानंतर चार महिन्यांपासून ती बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे जळगाव शहर विमानसेवेच्या नकाशावरून गायब झालेले आहे. ही सुविधा पुन्हा सुरू करण्यासाठी खासदार, जिल्हाधिकारी, उद्योजक व प्रभावशाली व्यक्तींचा समावेश असलेली स्थानिक समितीही गठीत करण्यात आलेली आहे. या समितीची पहिली बैठक गेल्या महिन्यात झाली आहे.

  तिसऱ्या टप्प्यात मुंबई सेवेसाठी परवानगी
  दुसऱ्या टप्प्यात ट्रू-जेटला अहमदाबादसाठी विमानसेवेला परवानगी मिळालेली असूनही ती सुरू झालेली नसताना कंपनीला उड्डाण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव-मुंबई सेवेसाठी परवानगी मिळालेली आहे. ही सेवा केव्हा सुरू करण्यात येईल, याबाबत कंपनीतर्फे अद्याप जाहीर करण्यात आले नाही. त्याची अधिकृत घोषणा कंपनीच्या संकेतस्थळावरच करण्यात येईल, असे कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

  70 आसनांची असेल विमानाची क्षमता
  या पूर्वीची व्यावसायिक विमानसेवा देणाऱ्या एअर डेक्कन कंपनीचा विमानाची क्षमता 16 आसनांचीच होती. मात्र, ट्रू-जेट कंपनीच्या विमानाची क्षमता ही 70 आसनांची असणार आहे. त्यामुळे अधिक जणांना विमानसेवेचा लाभ मिळू शकणार आहे. कंपनीला जळगाव- अहमदाबाद व जळगाव- मुंबई अशी परवानगी मिळाली असल्याने या सेवेला चांगला प्रतिसाद मिळू शकेल, असे कंपनीचा अंदाज आहे.

  अहमदाबाद सेवेसाठी ऑक्टोबर महिन्यातच मि‌‌ळाली परवानगी
  ट्रू-जेट कंपनीला उड्डाणच्या दुसऱ्या टप्प्यातच जळगाव- अहमदाबाद या विमानसेवेसाठी परवानगी मिळाली आहे. ही परवानगी गेल्या ऑक्टोबर महिन्यातच मिळाली आहे. त्यानंतर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जळगावात येऊन विमानतळाला भेट दिली होती. मात्र, त्यानंतर ही सेवा सुरू करण्याबाबत कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत. त्यामुळे जळगाव अहमदाबाद विमान सेवा सुरू झाली नाही.

Trending