आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर ऑनर किलिंग प्रकरण : रुक्मिणीच्या हत्येप्रकरणी पती मंगेशला अटक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - निघोज येथील रुक्मिणी रणसिंग हत्येप्रकरणी पती मंगेशला पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुक्मिणीला पेटवताना मंगेश भाजला होता. त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्याला गुरूवारी  रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यानंतर लगेचच पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पारनेर येथे आणले. चारित्र्याच्या संशयावरुन मंगेशने १ मे रोजी रुक्मिणीला तिच्या माहेरी पेटवून दिले. गंभीर भाजलेल्या रुक्मिणीचा ससून रुग्णालयात मत्यू झाला. मंगेशने मात्र आम्ही आंतरजातीय विवाह केल्याने मला व माझी रुक्मिणीला तिचे वडील, चुलते आणि मामांनी पेटवून दिल्याची फिर्याद दिली. मंगेशच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वडील राम भरतीया, चुलता सुवेंद्रकुमार आणि मामा घनश्याम राणेज यांच्यावर गुन्हा दाखल करून चुलता सुवेंद्रकुमार आणि मामा घनश्याम यांना अटक केली. मंगेशच्या बनावामुळे हे प्रकरण ऑनर किलिंगचे म्हणूनही गाजले.