अन्नत्याग करणाऱ्या शेतकरी / अन्नत्याग करणाऱ्या शेतकरी कन्येची तब्येत खालावली, पुणतांब्यात ३ युवतींच्या उपोषणाचा पाचवा दिवस 

प्रतिनिधी

Feb 08,2019 08:41:00 AM IST

पुणतांबा (जि. नगर) - चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत असलेल्या पुणतांब्यातील शेतकरी कन्यांपैकी शुभांगी जाधवची प्रकृती गुरुवारी खालावली. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या अहवालानुसार, तिला नगरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यासाठी राहत्याच्या तहसीलदारांनी मनधरणी केली. मात्र, मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत जागेवरून हलणार नसल्याचा निर्धार व्यक्त तिने व्यक्त केला.


किसान क्रांतीच्या 'देता की जाता?' या आंदोलनाला शुभांगी संजय जाधव, निकिता धनंजय जाधव व पूनम राजेंद्र जाधव यांनी पाठिंबा देऊन अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. गुरुवारी किसान क्रांती कार्यकर्त्यांनी स्टेशन रस्त्यावर फेरी काढून "भीक मांगो' आंदोलन केले. या आंदोलनातून जमा झालेली रक्कम ४६४ रुपये मनिऑर्डरने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही सायंकाळच्या सुमारास तरुणींची भेट घेऊन मागण्या समजून घेतल्या व मुख्यमंत्री कार्यालयाकडे याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

X
COMMENT