आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'न्यायदानातील विलंब टाळण्यास एआय उपयुक्त' : सरन्यायाधीश, मानवी न्यायाधीशांना पर्याय नसल्याची स्पष्टोक्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू : न्याय प्रक्रियेतील विनाकारण विलंब थांबवण्याबाबत सरन्यायाधीश एस.ए. बोबडे न्यायालयांत कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणेचा (एआय) अवलंब करण्याची शक्यता तपासत आहेत. बंगळुरूत शनिवारी एका कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. तथापि, एआय यंत्रणा मानवी न्यायमूर्तींची जागा घेणार नाही. केवळ निकालांच्या द्विरुक्ती, गणितीय व तांत्रिक भागात याची मदत घेतली जाऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरन्यायाधीश म्हणाले, 'मी स्पष्ट करू इच्छितो की आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स सिस्टिम ही मानवी न्यायाधीशांची जागा घेणार नाही. ही यंत्रणा मानवी विवेकाला पर्याय ठरू शकत नाही. न्यायदानात विनाकारण विलंब होऊ नये, हे कोर्टांनी सुनिश्चित करावे.'

मध्यस्थीचे प्रयत्न व्हावेत

सरन्यायाधीश म्हणाले, न्यायदानातील विलंब हा कोणत्याही व्यक्तीला कायदा हातात घेण्याचे कारण ठरू शकत नाही. सरन्यायाधीशांनी खटला दाखल करण्याआधीच मध्यस्थतेची जोरदार बाजू घेतली. ही आजची गरज असल्याचे ते म्हणाले.
 

बातम्या आणखी आहेत...