आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असदुद्दीन ओवैसींचा प्रचारसभेत पतंग डान्स, 'मियां भाई' गाण्यावर कार्यकर्त्यांसोबत थिरकले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या भन्नाट डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते चक्क पतंग डान्स करताना दिसून आले. निमित्त होते, ते औरंगाबादेतील उमेदवारांच्या प्रचाराचे. पैठण गेटवर झालेल्या सभेनंतर खाली उतरताना त्यांनी मियां भाई या गाण्यावर स्टेप्स करून दाखवल्या. ओवैसींना पहिल्यांदाच अशाप्रकारे नाचताना पाहिले.
 
ओवैसींचा व्हायरल झालेला व्हिडिओ औरंगाबादेतील पैठण गेट येथील एका प्रचार सभेतील आहे. येथील आयोजित सभा संपल्यानंतर ओवेसींनी 'मियाँ भाई' गाण्यावर पतंग उडवण्याच्या स्टाइलमध्ये डान्स केला. पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचार सभा घेण्यासाठी आलेले ओवैसी भाषण आटोपून मंचावरून खाली उतरत असताना अचानक म्यूझिक वाजले आणि ओवेसींनी त्यावर ठेका धरला. ओवैसींना नाचताना पाहून कार्यकर्त्यांनी देखील डान्स करण्यास सुरुवात केली होती. 

बातम्या आणखी आहेत...