आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरियात गव्हर्नरच्या ताफ्यावर हल्ला, ८ सुरक्षा जवान शहीद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काबूल  : अफगाणिस्तानच्या लोगार प्रांताचे गव्हर्नर व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ताफ्यावर रविवारी सकाळी तालिबानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या कारबाॅम्ब हल्ल्यात किमान ८ जणांचा मृत्यू झाला. मृतांत सुरक्षा दलाच्या जवानांचा समावेश आहे. घटनेत १० जण जखमी झाले.  
लोगार प्रांताचे पोलिस प्रवक्ते शापूर अहमदजाई म्हणाले, हल्ला लोगार-काबूल महामार्गावर मोहंमद आगा जिल्ह्यातील साफिद सांग भागात झाला. या हल्ल्यात गव्हर्नर व प्रांतीय गुप्तचर प्रमुख बालंबाल बचावले. हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना तालिबानने स्वीकारली.  
अमेरिका-तालिबान चर्चेसाठी पाक तयार : कुरेशी  अमेरिका-तालिबान यांच्यातील वाटाघाटी सुरू व्हाव्या यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ही चर्चा सुरू झाली तर त्याचा सर्वात जास्त फायदा अफगाणिस्तानच्या सरकारला होईल. त्यामुळे संपूर्ण क्षेत्रात शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सांगितले. चीन-पाकिस्तान-चीन आर्थिक प्रकल्पावर पाकिस्तान अतिशय गंभीर असल्याचे कुरेशी यांनी सांगितले.  चीन-पाकिस्तान यांच्यातील जवळीक आता वाढू लागली आहे. त्यामुळेच चीनने पाकिस्तानात हस्तक्षेप करण्यासही सुरूवात केली आहे. सीमा भागात चीनने काही हवाई तळ उभारण्याची देखील योजना आखली आहे. त्याला पाकने हिरवा कंदील दाखवला आहे. 

 

सिरियात हवाई हल्ला, ३१ जणांचा मृत्यू  
सिरियातील डील अल-जोर प्रांतातील बागुज तहतानी गावात अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय सैन्याच्या हवाई हल्ल्यात किमान ३१ जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी हा हल्ला झाला. त्यात तीन कुटुंबांतील लोक मृत्युमुखी पडले. यासंबंधी कारवाई करण्याची मागणी सिरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने संयुक्त राष्ट्राला पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे.  

बातम्या आणखी आहेत...