Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | air conditioner summer health tips in marathi

सतत एसीत बसल्यास वाढू शकतो लठ्ठपणा 

हेल्थ डेस्क | Update - Apr 12, 2019, 12:04 AM IST

अलबामा युनिव्हर्सिटीच्या संशोधनानंतर एअर कंडिशनरच्या वापरामुळे लठ्ठपणा वाढतो.

 • air conditioner summer health tips in marathi

  कार्यालय, घर किंवा कारमध्ये एअर कंडिशनरमध्ये बसून तुम्ही उष्णतेपासून आराम मिळवू शकता, परंतु आरोग्यासंबंधी अशा कित्येक समस्या आहेत ज्या यामुळे होऊ शकतात. म्हणून काही वेळ सामान्य तापमानात राहण्याची सवय करा, जे आराेग्यदायी राहण्यास मदत करेल.


  लठ्ठपणा वाढतो
  अलबामा युनिव्हर्सिटीच्या संशोधनानंतर एअर कंडिशनरच्या वापरामुळे लठ्ठपणा वाढतो. गारवा असलेल्या ठिकाणी नेहमी आमच्या शरीरातील ऊर्जा खर्च होत नाही, ज्यामुळे शरीरातील चरबी वाढते.
  काय करावे : एकाच जागेवर जास्त वेळ बसू नका. लो फॅटचा आहार घ्या.


  दम्याची समस्या
  एअर कंडिशनर फिल्टर अस्वच्छ असेल तर दम्याची समस्या होऊ शकते. यामुळे घशात खवखव अाणि सर्दी-खोकल्याची समस्या होऊ लागते. कित्येक लोकांना सारखा खोकलाही होतो.
  काय करावे : एअर कंडिशनरच्या फिल्टरची सर्व्हिसिंग करावी


  सांधेदुखी
  गारव्याचा सरळ परिणाम शरीराच्या सांध्यांवर होतो. यामुळे गुडघे, हात आणि मानेत दुखते आणि आखडते. सतत याच अवस्थेत राहिल्यामुळे आर्थरायटिससारखा गंभीर आजारही होऊ शकतात.
  काय करावे : एकाच जागी जास्त वेळ बसू नका. यामुळे दुखणे वाढू शकते.


  डोकेदुखी
  सतत एअर कंडिशनमध्ये बसल्यामुळे स्नायूंवर ताण येतो, जे डोकेदुखीचे एक मोठे कारण आहे. यामुळे स्नायूमधील दुखणे वाढण्याची शक्यता असते. वय वाढल्यानंतर ही समस्या गंभीर होऊ शकते.
  काय करावे : एसीचे तापमान जास्त ठेवू नका. गारव्यात डोक्याला कापड बांधून घ्या.


  डोळ्यांत कोरडेपणा
  एअर कंडिशनरमध्ये राहिल्यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा वाढण्याची समस्या होऊ शकते. याशिवाय डोळ्यात पाणी, जळजळ आणि खाजदेखील होते.
  काय करावे : दिवसभरात जास्तीत जास्त वेळा डोळे धुवा. पापण्यांची सारखी उघडझाप करा.


  त्वचेचा कोरडेपणा
  एसी सुरू असल्यास हवेतील आर्द्रता कमी होते आणि याचे दुष्परिणाम तुमच्या त्वचेवर दिसून येतात. यामुळे तुमच्या त्वचेची नैसर्गिक कोमलता संपवते. त्वचा काेरडी होते.
  काय करावे : पाणी जास्त प्या. त्वचेला मॉइश्चराइज करायला विसरू नका.

Trending