आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'उडान\'मध्ये सेवेची हमी पूर्ण न केल्याने एअर डेक्कनचा करार रद्द: अनामत रक्कमही जप्त करण्याचे अादेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - केंद्र सरकारच्या ‘उडे देश का अाम नागरिक’ (उडान) या याेजनेचा महाराष्ट्रात बट्ट्याबाेळ केल्याने एअर डेक्कन या विमान कंपनीशी केलेला करार रद्द करत त्यांची अनामत रक्कमही जप्त करण्याचे अादेश भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दिले अाहेत. नाशिक, साेलापूर, काेल्हापूर, जळगाव, अाैैरंगाबाद या शहरांना नियाेजित विमानसेवा मिळावी यासाठी २६ डिसेंबर राेजी पुन्हा बाेली प्रक्रिया राबवली जाईल.

  
विमानतळ प्राधिकरणाकडून एअर डेक्कन चार्टर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने महाराष्ट्रातील मुंबई-नाशिक-पुणे-नाशिक, मुंबई-अाैरंगाबाद, मुंबई-काेल्हापूर, मुंबई-जळगाव, मुंबई-साेलापूर या मार्गांवर ‘उडान’ याेजनेंतर्गत विमानसेवा देण्यासाठी निवड करण्यात अाली हाेती. यासाठी १८ अाॅक्टाेबर २०१७ राेजी करारही केला. नियाेजित वेळेत सेवा सुरू न केल्याने नाशिकचे खासदार हेमंत गाेडसे यांनी दिल्लीत हजाराे कार्यकर्त्यांसह अांदाेलन करत असंताेष व्यक्त केला हाेता. यानंतर मिळालेल्या अाश्वासनानुसार नाशिक विमानतळावरून एअर डेक्कनने मुंबई व पुण्यासाठी विमानसेवा सुरू केली. यानंतर जळगाव-मुंबई, काेल्हापूर-मुंबई या शहरांसाठी सेवा सुरू केली, मात्र त्यात प्रचंड अनियमितता, विश्वासार्हतेबाबतच्या अनेक तक्रारी येत हाेत्या.

 

यातच दाेन वेळा अचानक सेवा काही महिन्यांकरिता स्थगित केली हाेती. यातून नाशिकमध्ये विमानसेवेची पुरेशी क्षमता असतानाही इतर विमान कंपन्यांपुढे नकारात्मक चित्र जार्इल, अशी स्थिती निर्माण हाेत असल्याने संतापाची लाट उसळली हाेती. याचाच परिपाक म्हणून एअर डेक्कनला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी गाेडसे यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे केली हाेती.   

 

अगाेदर कारणे दाखवा नाेटीस, मग थेट करार रद्द   
प्राधिकरणाने केलेल्या चौकशीत एअर डेक्कनने उडान याेजनेत मिळालेल्या मार्गांवर ७० टक्क्यांपेक्षाही कमी फ्लाइट अाॅपरेट केल्याचे समाेर अाले. यानंतर कंपनीला ‘कारणे दाखवा नाेटीस’ बजावण्यात अाली हाेती. यावर मिळालेल्या उत्तराने समाधान न झाल्याने भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे ठेवलेली सुरक्षा अनामत जप्त करण्यासह करार रद्द करण्याचे अादेशच उडान याेजनेचे महाव्यवस्थापक प्रदीप कुमार यांनी काढले अाहेत.

 

बातम्या आणखी आहेत...