आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या हवाई दल उप-प्रमुखांनी चुकून आपल्याच पायात झाडली गोळी, रुग्णालयात दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाचे व्हाइस चीफ ऑफ एअर स्टाफ, एअर मार्शल शिरीष बबन देव यांनी चुकून बुधवारी आपल्याच पायात गोळी झाडली आहे. यानंतर त्यांना उपचारासाठी दिल्लीतील आरआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जारी केली. एअर मार्शल देव यांनी जुलै महिन्यातच व्हाइस चीफ ऑफ दी एअर स्टाफचे पद स्वीकारले आहे. त्यांनी बीएस धानोआ यांची जागा घेतली. बीएस धानोआ भारताचे विद्यमान एअर चीफ आहेत. 


एसबी देव नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज वेलिंग्टन येथील विद्याथी आहेत. त्यांनी 15 जून 1979 रोजी भारतीय हवाई दलात फायटर पायलट म्हणून पद स्वीकारले होते. त्यांनी मिग-21 बायस स्क्वार्डनचे एअर ऑफिसर कमांडिंग आणि सिग्नल युनिटच्या जबाबदाऱ्यांसह भारताच्या महत्वाच्या हवाई बेसवर चीफ ऑपरेटिंग ऑफिसरचे पद देखील भूषविले आहे. 

बातम्या आणखी आहेत...