आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वायुसेनेने विंग कमांडर अभिनंदन यांच्या पराक्रमावर बनवला व्हिडिओ गेम, 31 जुलैला होणार लॉन्च

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अम्बाला(हरियाणा)- विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांच्या शौर्याची गाथा आता व्हिडिओ गेममध्ये दिसणार आहे. यासाठी भारतीय वायुसेना एक गेम लॉन्च करणार आहे. विंग कमांडर अभिनंदन यात लीट रोलमध्ये असतील. हा गेम मोबाइल प्ले स्टोरवर अँड्रॉयड आणि आयओएस प्लेटफार्मवर उपलब्ध असेल.


राफेलही सामील
मोबाइल गेमची सुरुवात त्यात लडाकू मिग-21 विमानाने होते, ज्याच्या मदतीने विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानच्या एफ-16 विमानानला पाडले होते. मिग-21 च्या बाजुला उभे असलेले ते दिसतील. सुरुवातीला हा सिंगल प्लेअर मोडणध्ये उपलब्ध असेल. नंतर याला मल्टी प्लेअर मोडमध्येही उपलब्ध केले जाईस.

 

मोबाइल गेममध्ये मिग-21 शिवाय लवकरच एअरफोर्समध्ये सामील होणाऱ्या राफेल विमानालाही दाखवण्यात आले आहे. मोबाइल गेमचा व्हिडिओ एअरफोर्सने पोस्ट केला आहे, ज्यात राफेलशिवाय अग्रिम पंक्तिचे विमान सुखोई 30 एमकेआई, मिग-29 आणि बालाकोटमध्ये बॉम्बींग करणाऱ्या मिराज-2000 विमानांनाही दाखवण्यात आले आहे. या गेममध्ये अनेक युझर्स फ्रेंडली चॅलेंजेस असतील.