Home | International | Other Country | Air hostess breastfeeds stranger crying baby in flight

फ्लाइटमध्ये अचानक रडू लागले बाळ, कित्येक प्रयत्न केले तरी शांत बसेना... कारण समजल्यानंतर एअरहोस्टेसने केले असे काही... इमोशनल झाली आई

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 02:43 PM IST

एअरहोस्टेसची ऑफर ऐकून इमोशनल झाली आई.

 • Air hostess breastfeeds stranger crying baby in flight

  मनीला - फिलिपीन्सच्या एका एअरलाइंसमध्ये काम करणारी एअरहोस्टेस सध्या चर्चेचा विषय बनली आहे. ती ड्युटीवर असताना अचानक एक बाळ रडू लागले. खूप वेळ शांत न झाल्यामुळे तिने त्या बाळाच्या आईला रडण्यामागचे कारण विचारले. तेव्हा तिला कळाले की, बाळाचे फॉर्मुला मिल्क संपले आहे. अशात बाळाला शांत करण्यासाठी एअरहोस्टेसने ब्रेस्टफीड करण्याची ऑफर दिली. हे ऐकताच बाळाची आई इमोशनल झाली आणि तिने बळाला तिच्याकडे दिले.

  मदतीसाठी पुढे आली एअरहोस्टेस
  >> डोमेस्टिक फ्लाइटमध्ये काम करणारी एअरहोस्टेस पत्रिशाला फ्लाइटमध्ये विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला. सकाळच्या फ्लाइटमध्ये ती ड्युटीवर होती तेव्हा अचानक एक बाळ रडायला लागले.

  >> बाळाचे रडणे थांबत नसल्याने पत्रिशा तिच्या आई जवळ गेली, बाळाच्या आईने सांगितले की, बाळाचे फॅार्मूला मिल्क संपले आहे आणि बाळाला पाजवण्यासाठी तिच्याकडे आता दुध नाहीये.

  >> तिने सांगितले की, बाळाची आई रात्रीपासून एअरपोर्टमध्ये अडकली आहे, ज्यामुळे तिच्याजवळचे फॅार्मूला मिल्क संपले आहे.

  >> एअरहोस्टेस स्वतः एका 9 महिन्यांच्या बाळाची आई आहे. आपल्याशिवाय त्या बाळाची मदत कुणीच करू शकणार नाही ही गोष्ट तिच्या लक्षात आली. त्यामुळे, तिने आपले दूध पाजवण्याची ऑफर दिली.

  >> महिलेने तिचे मूल त्या एअरहोस्टेस कडे दिले. त्यानंतर ते बाळ शांतच झाले नाही तर गाढ झोपीत गेले.

  काय म्हणाली एअरहोस्टेस?

  >> पत्रिशाने सांगितले, मी पण एक आई असल्यामुळे समजू शकते की, आपल्या बाळाची भुक भागवता न येने किती वाईट असत. या अशा वेळी आई बाळाला मदत करून मला खुप चांगल वाटत आहे.

  >> तिने सांगितले की, अनोळखी महिलेच्या बाळाला दुध पाजवणे हा खुप चांगला अनुभव आहे.

  >> बाळाची आई पत्रिशाच्या मदत पाहून खुप इमोशनल झाली आणि तिचे आभार मानु लागली.

 • Air hostess breastfeeds stranger crying baby in flight
 • Air hostess breastfeeds stranger crying baby in flight
 • Air hostess breastfeeds stranger crying baby in flight
 • Air hostess breastfeeds stranger crying baby in flight

Trending