आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत विमानातून बाहेर पडली Air Hostess, गंभीर जखमी; दार बंद करताना घडला अपघात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एअर इंडियामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमान उड्डान घेण्यासाठी सज्ज होते. त्याचवेळी अचानक एक एअर होस्टेस विमानातून खाली पडली. ती गंभीररित्या जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विमान कंपनीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे विमान एआय-864 मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी सज्ज होते. त्यावेळी चालक दलच्या महिला सदस्याने दार बंद करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तोल गेल्याने ती थेट खाली पडली. 

An Air India air hostess fell off a Mumbai-Delhi flight this morning. She has been admitted to Mumbai's Nanavati hospital. pic.twitter.com/9XRPyryIGz

— ANI (@ANI) 15 October 2018

 

बातम्या आणखी आहेत...