आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअर इंडियाने मेनू बदलला; आता कोल्ड ड्रिंक्सऐवजी कैरीचे पन्हे, ताक, मसाला लस्सी, बर्गरऐवजी पोहे, उपमा मिळणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - प्रवाशांना सोयी-सुविधा देण्याच्या प्रयत्नात एअर इंडियाने आपल्या मेनूत बदल करत भारतीय पदार्थांना प्राधान्य दिले आहे. प्रवाशांना आता कोल्ड ड्रिंक्स व ज्यूसऐवजी कैरीचे पन्हे, ताक व मसाला लस्सी मिळणार आहे. यासोबत नाष्टा, दुपारचे जेवण व रात्रीच्या जेवणातील पदार्थातही बदल केला आहे. प्रवाशांच्या सल्ल्यानुसार एअर इंडियाने दोन वर्षांनी हे बदल केले आहेत. प्रवाशांना हाय-टीमध्ये तळलेले- भाजलेले पदार्थ व कापलेली फळे व सॅलड दिले जाणार नाहीत. त्याऐवजी भारतीय पदार्थ उदा. इंदूरचे नमकीन आदी दिले जाईल. देशांतर्गत विमानसेवेत नवे पदार्थ देण्यास सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये १ एप्रिलपासून ते दिले जातील. 


जेवणात तीन पदार्था(छोले-भात, राजमा-भात व कढी-भात) ऐवजी दोन पदार्थ व यासोबत स्टफ्ड पराठा व योगर्ट दिले जाईल. नाष्टा व हाय-टीमध्ये बर्गर, ब्रेड रोलऐवजी आता पोहे, शाकाहारी उपमा व पावभाजी दिली जाईल. लांब पल्ल्याच्या विमानात प्रथमश्रेणी व बिझनेस क्लासमध्ये पर्याय म्हणून कैरी, अद्रक, पुदिन्याची चटणी व घरी तयार केलेले अद्रक-लिंबाचे लोणचे, हिरवी मिरची व पापड मिळेल. उन्हाळ्यात दही-भात मिळेल. अमेरिकेला जाणाऱ्या विमानात दोन्ही श्रेणीत स्पेशल कुकीजसोबत बरिस्ता वा स्टार बक्सची कॉफी असेल. सहा महिन्यांनंतर मेनूचा आढावा घेतला जाईल. 

बातम्या आणखी आहेत...