आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअर इंडियाच्या विक्रीतून सरकारच्या तिजोरीत 7 हजार कोटी मिळणे शक्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आर्थिक विवंचनेत अडकलेली हवाई वाहतूक कंपनी एअर इंडियाचे ओझे आपल्या खांद्यावर खूप दिवस वागवावे, अशी सरकारची इच्छा दिसत नाही. परिणाम सरकार या कंपनीस पुढील आर्थिक वर्षापर्यंत विकण्याची योजना आखत आहे. या व्यवहारातून सरकारच्या तिजोरीत १ अब्ज डॉलर म्हणजे ७००० कोटी रुपये येऊ शकतात. एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, सरकार आर्थिक वर्ष २०१९-२०२० च्या दुसऱ्या सहामाहीत विक्रीची प्रक्रिया सुरू करू शकते.

याआधी सरकार याच्या काही सहयोगी कंपन्या व मालमत्तांची विक्री करण्याचा प्रयत्न करेल. 

 

एअर इंडियावर ५५,००० कोटी रुपयांहून जास्त कर्ज आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या समितीने २९,००० कोटी रुपयांचे कर्ज स्पेशल पर्पज वीकल'कडे हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली होती. ही एअर इंडियाची अॅसेट्स होल्डिंग कंपनी आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही एअर इंडिया विकून ७ हजार कोटी रुपयांपर्यंत जमा करण्याची आशा आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात एअर इंडियाला विकण्याच्या अयशस्वी प्रयत्नानंतर अरुण जेटली यांच्या नेतृत्वाखालील समितीने विक्री प्रक्रिया काही काळापर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला होता. कर्ज संकटात अडकलेल्या कंपनीत आणखी काही गुंतवणूक केली जावी, कर्जात कपात केली जावी तसेच काही जमीन व सहयोगी कंपन्यांची िवक्री करून कर्ज कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता 
 

बातम्या आणखी आहेत...