Home | Business | Industries | air india doing savings

एयर इंडियाने धरला बचतीचा मार्ग

agency | Update - May 29, 2011, 06:36 PM IST

एयर इंडिया कंपनी एकीकडे आर्थिक अडचणीत असताना आता तेल कंपन्यांनी कॅश अॅण्ड कॅरी बेसवर तेल देण्याचे सूचित केल्यानंतर कंपनीने काही विमानाची उड्डाणे रद्द करुन एकत्रित उड्डाणे करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • air india doing savings

    airindia_1000नवी दिल्ली- एयर इंडिया कंपनी एकीकडे आर्थिक अडचणीत असताना आता तेल कंपन्यांनी कॅश अॅण्ड कॅरी बेसवर तेल देण्याचे सूचित केल्यानंतर कंपनीने काही विमानाची उड्डाणे रद्द करुन एकत्रित उड्डाणे करण्याचा निर्णय घेतला आहे.

    एयर इंडियाला सरकारकडून रक्कम येणेे बाकी असल्याने कंपनीची आर्थिक स्थिती खालावली आहे. एयर इंडिया कंपनीकडून तेल कंपन्यांना सुमारे दोन हजार कोटी रुपये देणे आहे. तेल कंपन्यांनी एयर इंडियाला नोटीस देऊनही ते पैसे भरु शकले नाहीत. त्यामुळे तेल कंपन्यांनी श्ुक्रवारपासून उधारीवर तेल देणे बंद केले असून रोखीनेच तेल दिले जाईल, असे बजावले आहे. त्यामुळे कंपनीने बचतीचा मार्ग धरला असून अनेक उड्डाणे एकत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.Trending