Home | Business | Industries | air india have no money for fuel

एयर इंडियाला तेल भरण्यासही पैसे नाहीत, अनेक उड्डाणे रद्द

agency | Update - May 27, 2011, 07:48 PM IST

भारत सरकारची हवाई कंपनी एयर इंडियाची आथिर्क स्थिती ढासळली असून कंपनीकडे विमानात तेल भरण्यासही पैसे नसल्याने काही विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली आहेत.

  • air india have no money for fuel

    भारत सरकारची हवाई कंपनी एयर इंडियाची आथिर्क स्थिती ढासळली असून कंपनीकडे विमानात तेल भरण्यासही पैसे नसल्याने काही विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. शुक्रवारी सरकारी तेल कंपन्यांनी वाढत्या उधारीमुळे एयर इंडियाला तेल देणे थांबवले होते. त्यामुळे चार आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान त्यानंतर एयर इंडिया व तेल कंपन्या यांच्यात चर्चेनंतर पुन्हा तेल देण्यास सुरवात केली. या बैठकीनुसार एयर इंडिया कंपनी यापुढे रोखीने तेल भरेल. त्यामुळे यानंतर एयर इंडियाला उधारीवर तेल मिळणार नसल्याचे उघड झाले आहे. इयर इंडियाला तेल कंपन्यांना मोठी रक्कम देणे बाकी असून, एकट्या इंडियन आॅइल कंपनीला सुमारे १९०० कोटी रुपये देणे आहे. एयर इंडियाला प्रत्येक दिवसाला १८.५ कोटीचे तेल खरेदी करावे लागते. मात्र त्यातील कंपनी केवळ १३.५ कोटीच देऊ शकते. तेल कंपन्या वेळेवर पैसे देणाऱया हवाई कंपन्यांना तेल किंमतीत सवलत देतात. तसेच तीन महिन्याचे क्रेडिटही देतात. मात्र एयर इंडिया उशीरा पैसे देत असल्याने त्यांना याचा फायदा घेता येत नाही. दरम्यान एयर इंडियाला अमेरिकेतील बोइंग कंपनीकडून वेळेत विमाने न दिल्याने सुमारे ४५० कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.Trending