आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Air India Is In For Sell; Full Amount Of Salaries Paid To Air India Staff Before Deportation: Hardeep Singh Puri

एअर इंडिया स्टाफला निर्गुंतवणुकीआधी थकीत वेतनाची पूर्ण रक्कम : नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी

2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • हवाई वाहतूक मंत्री म्हणाले, कायम कर्मचाऱ्यांना ३% हिस्सेदारी
 • कंपनीचा खरेदीदार एअर इंडिया ब्रँड नावाचा वापर सुरू ठेवू शकेल
 • नोव्हेंबरपर्यंत एआय व एआय एक्स्प्रेसमध्ये १६,०७७ लोक

नवी दिल्ली/मुंबई- एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीत कर्मचाऱ्यांचे हित ध्यानात घेतले जाईल. एअर इंडियाचा व्यवहार पूर्ण होण्याआधी एअरलाइन कर्मचाऱ्यांना वेतनाची पूर्ण थकीत रक्कम दिली जाईल. ही रक्कम सरकारद्वारे दिली जाईल. नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी सोमवारी हे आश्वासन दिले. ते सरकारद्वारे एआयची १००% हिस्सेदारी विकण्यासाठी बोली मागवण्याच्या निर्णयाची माहिती देत होते.
पुरी म्हणाले, सरकारकडे मर्यादित वित्तीय स्रोत आहेत. त्यामुळे एअर इंडियाला विकण्यासाठी तिला खासगी क्षेत्राकडे सोपवू इच्छितो. खासगी क्षेत्र एअरलाइन्स व्यवस्थित चालवण्यासाठी आपल्यासोबत भांडवल आणू शकते. उपलब्ध आकडेवारीनुसार, १ नोव्हेंबर २०१९ पर्यंत एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसमध्ये १६,०७७ कर्मचारी काम करत होते. यामध्ये कायम कर्मचारही आहेत. 

रोकड संकटामुळे एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्ण वेतन मिळू शकत नाही. वेतनाच्या रूपात १,३०० कोटी रुपये थकीत आहेत. पुरी म्हणाले, कायम कर्मचाऱ्यांना ३ टक्के हिस्सेदारी दिली जाणार आहे.

जास्त स्टाफ नाही; त्यामुळे कपात नाही


एअर इंडियाचे सीएमडी अश्वनी लोहानी म्हणाले, एअरलाइन्सकडे आवश्यकतेपेक्षा जास्त स्टाफ नाही. त्यामुळे कपातीची शक्यता नाही. कायम कर्मचाऱ्यांमध्ये ३६% येत्या पाच वर्षांत निवृत्त होणार आहेत. निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या आरोग्य लाभाचा सोडवला जाईल.

हिंदुजा समूह हिस्सेदारी खरेदी करू शकते


एअर इंडियाच्या खरेदीसाठी देशातील दिग्गज औद्योगिक घराणे हिंदूजा समूह आणि अमेरिकी फंड इंटरअप्सने आपली इच्छा दर्शवली असल्याचे सांगण्या येते. एक चतुर्थांश देणे यशस्वी बोलीदात्यास ट्रान्सफर, अतिरिक्त थकीत एचआयएएचएल चुकवेल नागरी उड्डयन मंत्री पुरी म्हणाले, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेस प्रतिष्ठित अॅसेट्स आहेत. २०१८-१९ मध्ये तिचा महसूल ३०,६३२ कोटी रुपये आहे. आंतरराष्ट्रीय ट्रॅफिक प्रकरणात एअर इंडियाची ५१% हिस्सेदारी आहे. एअर इंडियावर सुमारे ८०,००० कोटी रुपयांचे कर्ज आहे. निर्गुंतवणुकीच्या एक चतुर्थांश कर्ज-देणे(२३,२८६.५ कोटी रुपये) यशस्वी बोलदात्यास ट्रान्सफर होईल. देणेदारी वाढल्यास अतिरिक्त ओझे एआयएचएल उचलेल.

 • नोव्हें.१० पर्यंत कंपनीच्या ताफ्यात १४६ विमाने
 • आंतरराष्ट्रीय मार्गावर हिस्सेदारी १८.४% आणि देशात १२.७% आहे.
 • एअर इंडियाच्या नेटवर्कमध्ये ४५ आंतरराष्ट्रीय व ५७ देशांतर्गत गंतव्य समाविष्ट.
 • एअरलाइन्सच्या ताफ्यात २०१९ पर्यंत १४६ विमाने होती.

व्यवहार देशविरोधी : स्वामी
एअर इंडियाला विकण्याचा निर्णय पूर्णपणे देशविरोधी असल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. त्यांनी आपल्याच सरकारविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्याची धमकी दिली आहे.

क्रू-मेंबर्सना केवळ मूळ वेतन मिळते

एअर इंडियाच्या चालक दल सदस्यांना एका वर्षापासून केवळ मूळ वेतन मिळत आहे. त्यांना पूर्ण थकबाकी मिळाल्यास बरे होईल. एअर इंडियाचे लोक दोन कारणांना प्राधान्य देतात. एक- चांगले जेवण, दुसरे- विदेशी प्रवासात हिंदीत बोलण्याची सुविधा.
-जी.एस बावा, माजी जीएम, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया

विस्तार न झाल्यास निम्मी बाजारपेठ


एअर इंडियाचा बाजारातील हिस्सा सतत घटत १३% च्या आसपास राहिला. आणखी ५ वर्षे एअरलाइन्सचा विस्तार न झाल्यास तिचा मार्केट शेअर घटून ७-८% होईल. एवढ्या कमी मार्केट शेअरसह ही एअरलाइन्स अप्रासंगिक होईल.
-जितेंद्र भार्गव, माजी ईडी,  एअर इंडिया