Home | National | Delhi | Air India manager lost from almost six months

एअर इंडियाची मॅनेजर सहा महिन्यांपासून बेपत्ता, शोधासाठी इन्स्पेक्टरने चक्क दोघांच्या जन्मपत्रिका ज्योतिष्याला दाखवून विचारला उपाय

दिव्य मराठी विशेष | Update - Apr 17, 2019, 09:14 AM IST

महिलेच्या मुलाचा दावा, पोलिसांनीच दिला होता मंदिरात पूजा करण्याचा सल्ला

 • Air India manager lost from almost six months

  नवी दिल्ली- सुमारे सहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या एअर इंडियाच्या मॅनेजर सुरक्षणा नरुला (५८) यांचा शोध घेण्यात अपयशी ठरलेले दिल्ली पोलिस चक्क ज्योतिषाला शरण गेले आहेत. ही महिला सापडेल की नाही हे विचारण्यासाठी तपास अधिकारी असलेल्या इन्स्पेक्टर विजय यांनी चक्क स्वत:ची आणि बेपत्ता महिलेची जन्मपत्रिका ज्योतिषाला दाखवली. ज्योतिषानेही दोघांच्या जन्मपत्रिकेत महिला सापडेल असे योग असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे, तर पोलिसांनी बेपत्ता महिलेच्या मुलास काही उपाय करण्यास सांगितले. महिलेचा मेकॅनिकल इंजिनिअर असलेला मुलगा अनुभव नरुला याने हा प्रकार उघडकीस आणला. तर, इन्स्पेक्टर विजय यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला.


  अनुभव याने सांगितले, ‘पोलिसांनी मला आईची जन्मपत्रिका मागितली होती. ती पोलिसांनी ज्योतिषाला दाखवली. वर आम्हाला उपाय करण्यास सांगितले. छतरपूर मंदिरात पूजा करावयाची होती. गुरुवारी सकाळी पिवळे वस्त्र, पिवळे लाडू आणि पिवळी फुले वाहण्यास सांगण्यात आले. तसे आम्ही केले. मात्र, आई कधी सापडेल हे मात्र पोलिसांनी निश्चितपणे सांगितले नाही.’ अनुभवने सांगितले, आई बेपत्ता झाल्यानंतर काही दिवस उलटले. काहीच थांगपत्ता लागत नव्हता. आता तर पोलिसांचा तपास थंडावला आहे. ़

  आईच्या शोधासाठी इंजिनिअर मुलाने तयार केले मोबाइल अॅप
  सुलक्षणा यांचा मुलगा अनुभवने सांगितले, की त्याने दिल्ली-एनसीआरमध्ये दोन लाखाहून अधिक पत्रके वाटली. त्याने तंत्रज्ञांच्या मदतीने हेल्प फाइंड सुलक्षणा नरुला नावाचे अॅपही तयार केले आहे. पोलिस तसेच इतर तपास यंत्रणांसाठी हे अॅप तयार करण्यात आले होते.

  विमानतळ कर्मचाऱ्यांचीच चौकशी व्हायला हवी : पतीची मागणी


  सुलक्षणा यांचे पती डॉ. सुनील यांच्यानुसार, या प्रकरणी पत्नीसोबत काम करणाऱ्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांची चौकशी पोलिसांनी केलेली नाही. खरे तर या कर्मचाऱ्यांचीही चौकशी व्हायला हवी. कदाचित या चौकशीतून काही धागेदोरे हाती येऊ शकतील.

Trending