आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- आता तुम्ही 1 हजार रुपयांत दिवस-रात्र विमान प्रवास करु शकता. एअर इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी बंगळुरू-अहमदाबाद-बंगळुरू, दिल्ली-कोईम्बतूर-दिल्ली आणि दिल्ली-गोवा-दिल्ली या रूटवर एक नविन ऑफर लाँच केली आहे. या ऑफरअंतर्गत बंगळुरू-अहमदाबाद-बंगळुरू रूटचे बेस फेअर अवघे 1,000 रुपये असणार आहे. येणाऱ्या दिवसांत विंटर फेस्टीवलच्या हंगामात विमान प्रवास करण्यासाठी तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता.
तीन रूटवर असेल ही ऑफर
> बंगळुरू-अहमदाबाद फ्लाइट रात्री 12.30 वाजता बंगळुरू शहरातून उड्डान घेऊन रात्री 2.35 वाजता अहमदाबादला पोहचणार आहे. हीच फ्लाइट परतीसाठी रात्री 3.05 वाजता अहमदाबादमधुन उड्डाण घेऊन 5.25 वाजता बंगंळुरूत पोहचणार आहे.
> दिल्ली-कोईम्बतूर-दिल्ली रूटवर 2500 रुपयांचे बेस फेअर असणार आहे. ही फ्लाइट दिल्लीतून रात्री 9:15 वाजता उड्डान घेऊन रात्री 12:30 वाजता कोईम्बतूर विमान स्थानकावर पोहचेल. परतीच्या फ्लाइटची वेळ रात्री 1 ते 4 दरम्यान असणार आहे.
> दिल्ली-गोवा-दिल्ली रुटवर जाणारी फ्लाइट रात्री 10 वाजता दिल्लीवरुन उड्डान घेऊन 12.35 वाजता गोव्यात पोहचेल. परतीची फ्लाइट रात्री 1.15 वाजता सुरू होऊन सकाळी 3:40 वाजता दिल्लीला पोहचेल. या रुटचे बेस फेअर 3,000 रुपये असणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.