आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानाला उशिरा झाल्यामुळे प्रवाश्यांची क्रू मेंमर्सना मारहाण, कॉकपिट दरवाजा तोडण्याची दिली धमकी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • क्रू मेंबर्सशी झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उघडकीस आली घटना
  • एअर इंडियाने क्रू सदस्यांना घटनेचा सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले
  • तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवरून पार्किंगमध्ये परत आणावे लागले

नवी दिल्ली - दिल्लीहून मुंबईला जात असलेल्या एअर इंडियाच्या विमानात क्रू मेंबर्सला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सदरील घटना गुरुवारची असून शनिवारी याचा व्हिडिओ समोर आला आहे. गुरुवारी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तांत्रिक बिघाडामुळे एअर इंडियाच्या विमानाला उड्डाण घेण्यास उशीर झाला होता. यामुळे नाराज झालेल्या प्रवाशांनी क्रू मेंबर्सला मारहाण करत कॉकपिटचा दरवाजा तोडण्याची धमकी दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
एअर इंडियाचे प्रवक्ता धनंजय कुमार म्हटले की, व्यवस्थापनाने क्रू सदस्यांना त्यांच्यातील गैरकारभाराची सविस्तर माहिती सादर करण्यास सांगितले आहे. संबंधित अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.5 तास उभ्या विमानात बसून होते प्रवासी


एअर इंडियाचे विमान दिल्लीहून मुंबईला जाण्यासाठी गुरुवारी सकाळी 10.10 वाजता उड्डाण घेणार होते. प्रवाशांना सकाळी 9.15 वाजता बोइंग 747 विमानात बसवण्यात आले. तांत्रिक बिघाडामुळे विमान निश्चित वेळेवर उड्डाण घेऊ शकले नाही. यानंतर विमानाला धावपट्टीवरून पार्किंगमध्ये आणण्यात आले. यावेळी प्रवासी विमानातच बसलेले होते. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी वैमानिकांना कॉकपिटमधून बाहेर येऊन परिस्थिती स्पष्ट करण्यास सांगितले. बिघाड दुरुस्त न झाल्यामुळे दुपारी 2.20 वाजता प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. त्यानंतर त्यांना संध्याकाळी 6 वाजता दुसऱ्या विमानाने मुंबईला पाठवले. प्रवाशांना दिल्लीहून मुंबईला पोहोचण्यासाठी 8 तास उशीर झाला. 

 

भारतात लागू आहे 'नो फ्लाय लिस्ट'


एअर इंडिया म्हणाले की, विमानाला उशीर झाल्यास प्रवाशांची गैरसोय कमी करण्याचा एअरलाइन्स प्रयत्न करतात. परंतु, प्रवाशांनी क्रू मेंबर्ससोबत केलेली अपमानजनक वागणून जगात कुठेही सहन केली जात नाही. भारतात सुद्धा 'नो फ्लाय लिस्ट'चा नियम लागू आहे. यामुळे एखाद्या प्रवाशाने विमानात गोंधळ घातल्यास त्याच्या हवाई प्रवासावर आजीवन बंदी घातली जाऊ शकते.