आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Sweden: इमारतीला धडकले 179 प्रवाशांना घेऊन जाणारे Air India चे विमान; सर्वच प्रवासी सुखरूप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टॉकहोम - स्वीडनमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात होता-होता टळला आहे. 179 प्रवाशांना घेऊन जाणारे भारताचे विमान अचानक एका इमारतीला जाऊन धडकले. सुदैवाने या अपघातात कुठल्याही प्रकारच्या जीवितहानीचे वृत्त नाही. प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या अपघातातून सगळेच सुखरूप आहेत. हा अपघात नेमका कसा आणि का घडला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस आणि प्रशासन या घटनेचा गांभीर्याने तपास करत आहेत. या अपघाताचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. त्यामध्ये विमानाचा एक विंग इमारतीला धडकला आणि त्याचा एक भाग तेथेच अडकल्याचे दिसून येते.

 

स्वीडनच्या स्थानिक वेळेनुसार, संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास ही घटना घडला. स्वीडन विमानतळाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीप्रमाणे, फ्लाइट एअरपोर्ट टर्मिनल-5 वर उतरणे अपेक्षित होते. परंतु, रनवेपासून अवघ्या 50 मीटर अंतरावर विमान एका इमारतीला धडकले. तरीही विमान सुखरूप उतरवण्यात आले असून कुणालाही इजा झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच विमानतळावर फायर ब्रिगेडचे बंब आणि बचाव पथकांनी विमानाला घेराव घातला. सर्वच प्रवाशांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान दिल्लीहून निघाले होते.

बातम्या आणखी आहेत...