आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Air Traffic Rising In The US, Traffic In The Sky, The Same Situation In Japan, Train Station, Airport Are Crowded

अमेरिकेत वाढतेय हवाई वाहतूक, आकाशात काेंडी, जपानमध्येही हीच स्थिती, रेल्वे स्टेशन, विमानतळावर माेठी गर्दी

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
छायाचित्र जपानच्या टाेकियाे विमानतळाचे आहे. शनिवारी येथून 42,300 लाेकांनी हवाई प्रवास केला. - Divya Marathi
छायाचित्र जपानच्या टाेकियाे विमानतळाचे आहे. शनिवारी येथून 42,300 लाेकांनी हवाई प्रवास केला.

वॉशिंग्टन/टोकियाे : रस्त्यावर वाहतूक काेंडी हाेणे साधारण गाेष्ट आहे पण अमेरिकेच्या आकाशातही एक जानेवारीपर्यंत काेंडीहाेणार आहे हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. याचे कारण एक जानेवारीपर्यंत लाेक माेठ्या संख्येने सुट्टी साजरी करण्यासाठी बाहेर पडतील. यातील बहुतांश लाेक विमानाने प्रवास करणारे आहेत. याचे कारण अमेरिकेत दर तासाला १२ हजार विमाने उड्डाण करत आहेत. नाताळासाठी २१ डिसेंबर ते एक जानेवारीपर्यंत लाेकांना सुट्या असतात. या काळात ते मजा करण्याच्या मूड मध्ये असतात सुट्टीसाठी ते दुसऱ्या देशात जातात. अमेरिकेमध्ये जवळपास १०.४० काेटी लाेक एक जानेवारीपर्यंत सुट्टी साजरी करतील. अमेरिकेच्या वाहन संघटनेच्या मते, इतक्या माेठ्या संख्येने लाेक हवाई प्रवास करण्याची गेल्या १६ वर्षातील ही पहिली वेेळ आहे. जपानमध्येही हीच स्थिती आहे.

या दिवसात मेट्राे, रेल्वे स्टेशन आणि विमानतळावर माेठी गर्दी बघायला मिळत आहे. सुट‌्टीसाठी लाेक आपल्या शहरातून दुसऱ्या शहरात तर दुसऱ्या शहरातून लाेक येत आहेत.

३९ लाख लाेक खासगी वाहनाने प्रवास करतील

अमेरिकेत सुट्टीच्या दिवसात जवळपास ३९ लाख लाेक खासगी वाहनानेही प्रवास करतील. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या ३.९ % जास्त आहे. गेल्या वर्षीपेक्षा ३ % जास्त म्हणजे ३८.१० लाख लोक गाडी, बस, क्रूझ जहाजातून प्रवास करतील.