Home | International | Other Country | Airline asks woman to cover up or get off plane thomas cook

अंग झाका; अन्यथा लगेच विमानातून खाली उतरा!

वृत्तसंस्था | Update - Mar 15, 2019, 01:55 PM IST

महिला प्रवाशाने क्रॉप टॉप परिधान केला होता. त्यास विमान कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला. तत्काळ अंग झाका, अन्यथा विमानातून उत

  • Airline asks woman to cover up or get off plane thomas cook

    लंडन - इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये २१ वर्षीय महिला प्रवाशाला ब्रिटिश एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांकडून अतिशय संतापजनक वर्तनाला सामोरे जावे लागले. महिला प्रवाशाने क्रॉप टॉप परिधान केला होता. त्यास विमान कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला. तत्काळ अंग झाका, अन्यथा विमानातून उतरा, अशा शब्दांत त्यांनी महिला प्रवाशास असभ्य व भेदभावपूर्ण वागणूक दिली.


    मात्र या वागणुकीला विरोध होताच कंपनीचे डोके ठिकाणावर आले व त्यांनी झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. एमिली आे कॉनर असे या २१ वर्षीय महिलेचे नाव आहे. त्यांनी आपबीती पोस्ट करून कंपनीचे वर्तन चव्हाट्यावर आणले. हा माझ्या आयुष्यातील लिंगभेदाचा सर्वात भयंकर अनुभव होता. हा अनुभव लाजिरवाणा होता. मला विचारणा झाली तेव्हा मी सहप्रवाशांना माझ्या कपड्यांबद्दल विचारले, तुम्हाला काही त्रास आहे का ? क्रॉपटॉपवर गुपचूप जॅकेट परिधान करा, असे केवळ एका प्रवाशाने सांगितले. तो बोलल्यानंतरही कोणी माझ्या बाजूने बोलले नाही. तेव्हा विमान कर्मचारी तेथेच उभा होता. त्याने मला साथ दिली नाही. उलट उतरण्याची सूचना केली. हे पाहून माझ्या बहिणीने मला जॅकेट दिले. मी जॅकेट घालत नाही तोपर्यंत हा कर्मचारी तसाच उभा होता. धक्कादायक म्हणजे दोन आसने सोडून बसलेल्या एका प्रवाशाने शॉर्ट्स पँट व बनियन घातलेले होते. त्याला मात्र कर्मचाऱ्यांनी काहीही म्हटले नाही. ही तर भेदभावाची वागणूक आहे, असे एमिली यांनी सांगितले.


    एअरलाइन्स म्हणते- स्टाफने योग्य वर्तणूक द्यायला हवी होती
    थॉमस कूक एअरलाइन्सने मंगळवारी या घटनेबद्दल माफी मागितली आहे. ‘सामान्यपणे प्रवाशांसाठी एक उपयुक्त पोशाख धोरण असते. हे कोणताही भेदभाव न करता पुरुष व महिलांसाठी समान पद्धतीने लागू केले जाते. एमिली यांना मिळालेली वागणूक अयोग्य होती. फ्लाइटच्या कर्मचाऱ्याने योग्य वर्तणूक द्यायला हवी होती,’ असे एअरलाइन्सने म्हटले आहे.

Trending