आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी 7 वाजता तिकीट विक्री करणाऱ्या वॉव एअरलाइनने सायंकाळी प्रवाशांना पिझ्झा देत सांगितले- कंपनी बंद झाली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेक्झाविक- स्वस्तात सेवा देणाऱ्या आइसलँडच्या वॉव एअरलाइनने अचानक सेवा बंद केली आहे. एअरलाइन गुरुवारी सकाळी ७.०० वाजेपर्यंत तिकीट विकत होती. मात्र, सायंकाळी सेवा बंद करण्याची घोषणा करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या निर्णयामुळे युरोप व उत्तर अमेरिकेला जाणाऱ्या जवळपास १० हजार प्रवाशांना विमानतळावर अडकून पडण्याची वेळ आली. डेट्रॉइटहून डब्लिनकडे जाणारे दांपत्य म्हणाले, आमचे विमान सायं. ७ वाजता होते. मात्र, उड्डाणास तासातासाने उशीर होत गेला. रात्री ११.०० वाजता कंपनीचा स्टाफ आला, त्यांनी आम्हाला पिझ्झा दिला आणि सांगितले की, तुमचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. तुम्ही तुमची व्यवस्था करा. ही कंपनी आइसलँडसह २७ देशांत सेवा देत होती. यात बहुतांश अमेरिका व युरोपातील देशांचा समावेश आहे. एअरलाइनने गेल्या वर्षी ७ डिसेंबरला नवी दिल्ली ते रेक्झाविकदरम्यान सेवा सुरू केली होती. मात्र, काही दिवसांनंतर ती बंद केली हाेती. कंपनी ट्रान्स-अटलांटिक म्हणजे अटलांटिकपलीकडील ठिकाणांना जोडणाऱ्या उड्डाणांसाठी ओळखली जाते. कंपनी दीर्घकाळापासून तोट्यात सुरू होती. त्यातून सावरण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, यश मिळू शकले नाही. कंपनीच्या निवेदनानुसार, वॉव एअरने आपली सर्व कामे बंद केली आहेत. एअरलाइन्सची सर्व उड्डाणे बंद केली आहेत. प्रवासी दुसऱ्या कंपन्यांचे तिकीट घेऊ शकतात. क्रेडिट कार्डद्वारे पैसे दिलेल्यांनी क्रेडिट कार्ड कंपनीशी संपर्क साधावा. ज्यांनी युरोपीय एजंटांकडून तिकिटे घेतली हाेती, त्यांच्यासाठी एजंट अन्य उड्डाणांची व्यवस्था करू शकतात. प्रवाशांना वॉव एअरलाइनकडून भरपाईही मिळू शकते. मात्र, ती युरोपीय नियमांअंतर्गत असेल.  
बातम्या आणखी आहेत...