आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Airplane Built On The Roof Of The House, 8 Years After Getting Permission To Fly, Modi Called And Asked 'dream Come True'

घराच्या छतावर विमान बनवले, उड्डाणाची परवानगी मिळण्यासाठी लागली 8 वर्षे, मोदींनी बोलावून विचारले - 'स्वप्न तर पूर्ण झाले' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : मुंबईच्या गोरेगांवचा अमोल यादव व्यवसायाने कमर्शियल पायलट आहे. 19 वर्षे सुरु असलेल्या संघर्षानंतर त्याने स्वतः बनवलेल्या सहा सीटर विमानाला दोन दिवसांपूर्वी नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) उडवण्याची परवानगी दिली आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणानंतर तो दिल्ली येथे पोहोचला आणि त्यांची भेट घेतली. त्यांनी अमोलच्या प्रयत्ननाचे कौतुक करत विचारले - आता तुमचे स्वप्न तर पूर्ण झाले. यावर अमोल म्हणाला - ‘केवळ माझेच नाही तर संपूर्ण कुटुंबाचे स्वप्न पूर्ण झाले.’ त्याने आशा वारस्ताविली की, या उड्डाणात यश मिळाले तर देशात आपल्या गरजेप्रमाणे कमी वजनाचे आणि स्वस्त विमान बनवण्याचा काळ येईल. त्याने 19 सीटर विमानाच्या निर्मितीला सुरुवातही केली आहे. 

अमोलने सांगितले की, 90 च्या दशकात त्याने 19 वर्षे वयात अमेरिकामध्ये पायलटचे ट्रेनिंग घेतले होते. जेव्हा भारतात परतला तेव्हा त्याने एअरक्राफ्ट खरेदी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कळाले की, भारतात एअरक्राफ्ट बनवत नाहीत. तेव्हा स्वतःच एअरक्राफ्ट बनवण्याचा विचार डोक्यात आला. सुमारे 19 वर्षांपूर्वी चारकोप भागामध्ये आपल्या घराच्या छतावरच विमान बनवायला सुरुवात केली. हे त्याचे तिसरे विमान आहे. 

19 वर्षांमध्ये 5 कोटी खर्च केले, दोनदा अपयश आले... 
2003 पर्यंत दोन एअरक्राफ्ट बनवले, पण दोन्ही अयशस्वी राहिले. दोन्हींमध्ये खूप उणीव होत्या. पुन्हा सहा वर्षांच्या मेहनतीनंतर 2009 मध्ये नवे विमान तयार केले. यासाठी पिस्टन इंजिनसह अनेक पार्ट्स परदेशातून मागवले आणि एअरक्राफ्ट ग्रेडच्या एल्युमिनियमने विमानाचे एअरफ्रेम स्वतःच तयार केले.  हा प्रयत्न यशस्वी राहिला. अमोलने सांगितले की, 19 वर्षांत विमान बनवण्यात त्याने सुमारे 5 कोटी रुपये खर्च केले. 

विमानासाठी आईने दागिने विकले, भावाने घर गहाण ठेवेल... 
विमान बनवण्यासाठी अमोलने केवळ आपला संपूर्ण पैसाच गमावला नाही तर त्याच्या आईला आपले दागिनेदेखील विकावे लागले. मोठयक भावाने घर गहाण ठेवले होते, पण आता डीजीसीए उड्डाणापूर्वी अमोलचे विमान टीएसी-03 चे 40 तास टेस्टिंग करणार आहे. 2017 मध्ये या एअरक्राफ्टचे रजिस्ट्रेशन केले, पण उड्डाणाच्या परवानगीसाठी दोन वर्षांची अजून वाट पाहावी लागली. 

राज्य सरकारने करार करून एअरस्ट्रिप उपलब्ध करून दिली... 
जेट एअरवेजमध्ये दिवसा पायलटची नोकरी करून रात्री घरी विमान बनवणाऱ्या अमोलच्या यशानंतर महाराष्ट्र सरकारने त्याच्याशी 35 हजार कोटींचा करार केला आहे. त्याला पालघरमध्ये जागा आणि एअरस्ट्रिप उपलब्ध करून दिले. डिसेंबरमध्ये डीजीसीए त्याच्या विमानाचे परीक्षण करेल. जे विमान परदेशी कंपन्या एक ते दीड हजार कोटी रुपयांमध्ये बनवतात, तेच अमोल 250 कोटींमध्ये बनवणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...