विमान प्रवाशांना आजही / विमान प्रवाशांना आजही या बाबींची भीती

विमान प्रवासाच्या गैरसमजावर विश्वास ठेवणाऱ्याची संख्या अद्यापही मोठी आहे... येथे जाणून घ्या, विमान प्रवासाशी संबंधित काही खास गोष्टी...

Mar 09,2019 11:05:00 AM IST

विमान प्रवासाच्या गैरसमजावर विश्वास ठेवणाऱ्याची संख्या अद्यापही मोठी आहे...
- मोबाइल फोनमुळे विमान अपघात होतो, त्यामुळे तो बंद करायला लावला जातो किंवा फ्लाइट मोडवर ठेवला जातो. मात्र यामागचे कारण म्हणजे, टेकऑफ व लँडिंगवेळी प्रवासी सतर्क राहावेत व गंभीर स्थितीत त्यांना प्रतिसाद देता यावा.


- आकाशातील विजेमुळे विमान कोसळू शकते, अशी अनेकांना भीती असते. नव्या विमानासह आठवड्यात एकदा अशा विजेचा सामना करावा लागतो. विमानात याचा सामना करण्याची यंत्रणा असते.
- ऑटोपायलेट प्लेन उडू शकते... तसे असते तर एअरलाइन्सना वैमानिक नोकरीवर ठेवण्याची गरज राहिली नसती.
- लहान विमान धोकादायक असते, असे मानले जाते. काळजी केवळ वैमानिकाच्या कौशल्यावर असायला हवी.


- लोकांनी झोपावे यासाठी विमानात कमी ऑक्सिजन ठेवला जातो, असे अनेकांना वाटते. हे यामुळे चुकीचे आहे की, प्रवाशांना श्वास घेण्यासाठी जी हवा असते तीच वैमानिकालाही असते.
- मलमूत्र वाटेतच टाकून दिले जाते. अद्याप याची कुणीही तक्रार केली नाही.


- वैमानिकांकडे पॅराशूट असते, असे प्रवाशांना वाटते. एअरलाइन्स प्रवाशांना आणि वैमानिकांना पॅराशूट पुरवत नाही.तसे ते दिले असते तरी त्याचा त्यांना उपयोग करता आला नसता. कारण, लोकांना इच्छित ठिकाणी सुरक्षित पोहोचवणे हे त्यांचे काम आहे.


- सीट बेल्टमुळे अपघातात वाचण्याची शक्यता वाढते, असे प्रवाशांना वाटते. मात्र, डोके धडकत नाही एवढेच होते.
- प्रवासात दरवाजा उघडण्याची भीतीही काही प्रवाशांच्या मनात येते. मात्र, यासाठी सुपरमॅनसारखी शक्ती असावी लागते.

X