• Home
  • International
  • Airstrikes, her father Amjad screamed for help, Later both of the girls were taken to the hospital

International Special / हवाई हल्यानंतर 5 वर्षीय रिहमने आपला जीव गमावून वाचवले 7 महिन्यांच्या बहिणीचे प्राण


इदलिब शहरावर शुक्रवारी बॉम्ब टाकण्यात आले होते, यात एक इमारत जमिनदोस्त झाली

दिव्य मराठी

Jul 27,2019 03:46:00 PM IST

इदलिब- सिरीया सरकार आणि त्याच्या रशियातील सहकाऱ्यांनी त्यांच्या हवाई हल्यात अनेक कुटुंब उद्धवस्त केली आहेत. इदलिब शहरावर शुक्रवारी बॉम्ब टाकण्यात आले होते. यात एक इमारत जमिनदोस्त झाली. यात 5 वर्षीय रिहमने आपला जीव गमावून 7 महिन्यांच्या बहिणीचे प्राण वाचवले.


त्यांच्या बाजुलाच त्यांचे वडील अमजद मदतीची याचण करत होते. नंतर दोघी मुलींना रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचारादरम्यान रिहमचा मृत्यू झआला तर तुका अद्याप आयसीयूत आहे.


मागील 10 दिवसात 103 नागरिकांचा मृत्यू
मागील 10 दिवसात सिरीया सरकार आणि रशिया देशातील विविध शहरांवर हल्ले करत आहेत. यात आतापर्यंत 103 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, यात 26 लहान मुले आहेत.

यूएनने शुक्रवारी यावर चिंता व्यक्त केली की शाळा, रुग्णालय, बाजार, बेकऱ्या आणि गर्दी असलेल्या ठिकाणांवर सिरीया सरकार हल्ले करत आहे. सिरीअन ऑब्जर्वेटरी फॉर ह्यूमन राइट्सनुसार, याआधी इदलिब प्रांतातील खान शेखुन शहराजवळील शेतात झालेल्या बॉम्बींगमध्ये एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू झाला होता.

X