आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- रिलायंस इंडस्ट्रीज (RIL) ची टेलिकॉम कंपनी रिलायंस जियो (Reliance Jio) ने मोबाइलच्या जगात फ्री डेटा वारने टेलिकॉम इंडस्ट्रीला हजरून टाकले आहे. आधीपेक्षा खुप स्वस्त: डेटा, व्हॉइस कॉल आणि इतर सुविधा देऊन जियोने टेलिकॉम कंपन्यांना मोठा झटका दिला आहे. यातच जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल, वोडाफन, आयडियासारख्या टेलिकॉम कंपन्या वेगवेगले डाव आखत आहेत.
एअरटेलने त्यांच्या नवीन ग्राहकांसाठी खास प्लॅन लॉन्च केला आहे
प्राइस वॉरचे नुकसान सहन केलेल्या एअरटेल आणि वोडाफोन कंपन्या आता आपल्या स्ट्रॅटेजीला बदलत आहेत. या कंपन्यानी ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी नवीन प्रीपेड प्लॅन आणले आहेत. भारती एअरटेलने कमी होणाऱ्या ग्राहकांची संख्या पाहता 76 रूपयांचा नवीन प्लॅन आणला आहे.
एअरटेलचा 76 रूपयांचा प्लॅन
हा पहिला रिचार्ज आहे म्हणजे नवीन सिम घेतल्यानंतर हे रिचार्ज करावे लागेल, जुने ग्राहक हे रिचार्ज नाही करू शकत. यांत ग्राहकांना 28 रूपयांच्या टॉकटाइमसोबतच 100 एमबी डेटा त्यासोबतच 60 पैसे दराने लोकल आणि एसटीडी कॉलिंग मिळेल. हा प्लॅन सगळ्या ग्राहकांसाठी आहे आणि याची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.