आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरटेलने बंद केली सर्वात मोठी सेवा; 7 कोटी युझर्स सोडू शकता एअरटेल नेटवर्क

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- प्राइज वॉरचा फटका बसलेली टेलिकॉम कंपनी एअरटेलने आता पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एअरटेलला मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका अहवालानुसार, कंपनी आपली लाइफटाइम फ्री इनकमिंगचा प्लॅनची सेवा बंद करणार असल्यामुळे येत्या काही महिन्यांत 5 ते 7 कोटी युझर्स एअरटेल नेटर्वक सोडण्याचा अंदाज आहे. आता एअरटेलच्या नव्या नियमांनुसार, ग्राहकाला आपल्या सिममध्ये 35 रुपयांचा मिनिमम बॅलेन्स ठेवणे बंधनकारक आहे. एअरटेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, हा प्लॅन बंद केल्यानंतर अनेक सिम बंद होतील. परंतू या निर्णयातून होणारा तोटा भरुन काढण्यासाठी कंपनी आपल्या नियमित ग्राहकांना चांगली सवलत देणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


रिलायंस जिओने टेलिकॉम क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर सर्व टेलिकॉम कंपन्यांचे मोठे नुकसान झाले. सुरवातीलाच स्वस्त इंटरनेट, व्हाइस कॉलसह इतर सुविधा देऊन जिओने सर्वांना मागे टाकले. तर जिओला टक्कर देण्यासाठी टेलिकॉम कंपनी वोडाफोन, एअरटेल मोठे नुकसान सहन करुन ग्राहकांना सेवा देत आहे.

 

एअरटेलने आणला 23 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनअंतर्गत ग्राहकाला 23 दिवसांचा व्हॅलिडिटी मिळते. तसेच हा प्लॅन अॅक्टीवेट केल्यानंतर युझर्सला सर्व लोकल आणि एसटीडी कॉलसाठी 2.5 प्रतिसेकंद पैसे खर्च करावे लागतील. त्याशिवाय युझर्सला एसएमएस पाठवण्यासाठी 1 रुपया तर एसटीडीसाठी 1.5 रुपये खर्च करावे लागतील.

 

एअरटेलचा 35 रुपयांचा प्लॅन
एअरटेलने आणखी एक प्लॅन सादर केला आहे. 35 रुपयांच्या या प्लॅनमध्ये युझर्सला 26.66 रुपयांचा बॅलेन्स आणि 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे. त्याशिवाय 100 एमबी डेटा मोफत मिळणार आहे.

 

बातम्या आणखी आहेत...