Home | Business | Gadget | Airtel is shutting down its 3G network across India

एअरटेल मार्च 2020 पर्यंत बंद करेल देशभरातील 3G सर्व्हिस, कोलाकातमधून झाली याची सुरुवात

दिव्य मराठी वेब, | Update - Aug 05, 2019, 05:54 PM IST

यूझर्सना L900 टेक्नोलॉजीसोबत हाय स्पीड 4G सर्व्हिस मिळेल

  • Airtel is shutting down its 3G network across India

    गॅजेट डेस्क- 4G नेटवर्कची सर्व्हिस आता देशाच्या कानाकोपऱ्यात मिळत आहे. देशात याची सुरुवात सगळ्यात आधी जिओने कीलो होती,त्यानंतर एअरटेल, वोडाफोन, यांनीही 4जीची सुरुवात केली. पण आता, 3G नेटवर्क बंद करण्याची सुरुवात झाली आहे. एअरटेलने 3G नेटवर्क बंद करण्याची सुरुवात कोलकातापासून केली आहे. तर आता कंपनी मार्च 2020 पर्यंत देशभरातील 3G सर्व्हिस बंद करेल.

    गोपाल विट्टल, भारती एअरटेल के सीईओ (भारत आणि दक्षिण आशिया)यांनी सांगितले की, आम्ही जून त्रैमासिकात कोलकातामध्ये 3G नेटवर्क बंद करण्याचे काम सुरू केले आहे. तर सप्टेंबरपर्यंत 6-7 इथर क्षेत्रात याच्या सर्व्हिसला बंद करण्यात येईल. तर, डिसेंबर ते मार्च (2020)दरम्यान संपूर्ण देशातील 3G नेटवर्क बंद केली जाईल. जर कोणी ग्राहक 2G वरुन 4G नेटवर्कवर येतो, तर आम्ही त्याला अपग्रेडिंग असे समजू, एप्रिल 2020 आमच्याकडे फक्त 2G किंवा 4G स्पेक्ट्रम असेल.

    ग्राहकांना 4G सर्व्हिस मिळेल
    कोलकातामध्ये 3G सर्विस बंद झाल्यानंतर यूझर्सना L900 टेक्नोलॉजीसोबत हाय स्पीड 4G सर्व्हिस मिळेल. ही अशी टेक्नोलॉजी आहे, जिथे यूझर्सना गर्दी असलेल्या जागेंवर, बेसमेंट, बाजार, ऑफीस आणि मॉलमध्ये चांगले नेटवर्क मिळेल. एअरटेलच्या या निर्णयामागे त्याला होत असलेले नुकसान असल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीला चालू आर्थिक वर्षात पहिल्या त्रैमासिकात 2,866 कोटींचा घाटा झाला आहे.

Trending