आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- अनिल अंबानी यांनी दिवाळखोर झालेली कंपनी रिलायंस कम्युनिकेशंस (आरकॉम) चे अॅसेट्स खरेदी करण्यासाठी भारती एअरटेल, रिलायंस जिओ, वरदे कॅपिटल आणि यूवी अॅसेट रिकंस्ट्रक्शन, या कंपन्यानी बोली लावली आहे. आरकॉमचे कमेटी ऑफ क्रेडिटर्स (सीओसी) शुक्रवारी खरेदी करणाऱ्यांची निवड करतील.
वृत्तसंस्थानी दिलेल्या माहितीनुसार, आरकॉम, रिलायंस टेलीकॉम आणि रिलायंस इन्फ्राटेलच्या अॅसेट्ससाठी 11 कंपन्या बोली लावण्यासाठी आल्या होत्या आय स्क्वायर्ड कॅपिटल बिडिंगमध्ये सामील नाही झाली. असे मानले जात आहे की, ते आरकॉमचा डेटा सेंटर आणि ऑप्टिकल फायबरसाठी बोली लावतील.
दिवाळखोर प्रक्रियेअंतर्गत आरकॉमच्या कर्जदात्यांनी ऑगस्टमध्ये 49,000 कोटी रुपयांचे दावे सादर केले होते. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल(एनसीएलटी)च्या आदेशनुसार रेजोल्यूशन प्रोफेशनलला 10 जानेवारी 2020 पर्यंत आरकॉमच्या अॅसेट्स विक्रीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.