आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Airtel Launches 3 New Truly Unlimited Plan, Unlimited Calling Will Be Available On All Networks

एअरटेलने आणले 3 नवीन पूर्णपणे अनलिमिटेड प्लॅन, सर्व नेटवर्कवर मिळेल अनलिमीटेड कॉलिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंपनीने 219, 399 आणि 449 रुपयांचे तीन नवीन प्लॅन लॉन्च केले

गॅजेट डेस्क- एअरटेलचे नवीन टॅरिफ प्लॅन लागू झाल्याच्या 4 दिवसानंतर कंपनीने नवीन ट्रूली अनलिमिटेड प्लॅन लॉन्च केले आहेत. एअरटेल इंडियाने 6 डिसेंबरला ऑफिशियली ट्वीट करुन या प्लॅन्सची माहिती दिली. म्हणजेच आता एअरटेल ग्राहक एअरटेलसोबतच इतर कोणत्याही नेटवर्कवर फ्री अनलिमिटेड कॉलिंग करू शकतात. त्यांना FUP मिनीटांची गरज भासणार नाही.

एअरटेलचे 3 नवीन ट्रूली अनलिमीटेड प्लॅन
 
एअरटेलने ज्या 3 नवीन ट्रूली अनलिमीटेड प्लॅनला जाहीर केले आहे, त्यात 219, 399 आणि 449 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. या सर्व प्लॅनमध्ये देशातील सर्व नेटवर्कवर अनलिमीटेड कॉलिंग मिळेल. या प्लॅनमध्ये कोणतीही कंडीशन नसेल. या सर्व प्लॅनमध्ये ग्राहकांना हेलो ट्यून, अनलिमिटेड विंक म्यूजिक, एअरटेल एक्सट्रीम अॅपदेखील मिळतील.

एअरटेलने 3 डिसेंबरपासून नवीन टॅरीफ प्लॅन जाहीर केले होते, त्या प्लॅनमध्ये FUP मिनीटांची लिमीट होती. म्हणजेच, महिन्याला 1000 FUP मिनीट मिळायचे. तर, काही वर्षभराच्या व्हॅलिडीटी असलेल्या फ्लॅनवर 12000 FUP मिनीट मिळत होते. कंपनीकडून जारी केलेल्या या नव्या प्लॅनमध्ये काहीच लिमीट नाहीये.